पुणे

हवेलीत ग्रामपंचायतीप्रमाणे उत्साह

CD

केसनंद, ता. ७ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ जागांवरील २५ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १२ जागांवरील ४२ उमेदवारांसाठी मोठ्या उत्साहात सरासरी ६८.०२ टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादीला भाजपने आव्हान दिल्याने ती चुरस, तसेच यात्रा-जत्रांचा उत्साहही मतदानामध्ये दिसून आला. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे विक्रमी मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी गर्दी वाढली. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपताना ऐनवेळी आलेल्या मतदारांमुळे उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. मात्र, दिवसभर किरकोळ अपवाद वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
हवेली तालुक्यात एकूण २६३ मतदान केंद्रावर १ लाख ३० हजार ८२१ पुरुष व १ लाख २० हजार ७०२ महिला, तर १० इतर, असे एकूण २ लाख ५१ हजार ५३३ मतदारांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. यामध्ये ३०६४ दुबार मतदारांवरही प्रशासनाचे लक्ष ठेवले होते. यापैकी ९० हजार २३ पुरुष व ८१ हजार ५१ महिला, तर इतर ७, अशा एकूण १ लाख ७१ हजार ८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पेरणे- लोणीकंद, केसनंद- कोरेगावमूळ, उरुळी कांचन- सोरतापवाडी, लोणीकाळभोर- कदमवाकवस्ती, थेऊर- आव्हाळवाडी, खेडशिवापूर- खानापूर, या ६ गटासह १२ पंचायत समिती गणात मोठ्या उत्साहात मतदान झाले. हवेलीत मतदानाच्या पहिल्या दोन तासात १९ हजार ६०८ म्हणजेच सुमारे ७.८० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, साडेअकरापर्यंत ४९ हजार ९०४ मतदार म्हणजेच सुमारे १९.८४ टक्के मतदारांनी मतदान केले होते. मात्र, यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची लक्षणीयरित्या कमी होती. दुपारी महीला मतदारांची संख्या वाढली. दुपारी साडेतीनपर्यत सुमारे ४९.६० टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये ६५ हजार ३५१ पुरुष व ५९ हजार ४१३ महिला, तर इतर ६, अशा एकूण १ लाख २४ हजार ७७० मतदारांचा समावेश होता. तर, दिवसभराच्या अंतिम आकडेवारीनुसार सुमारे ६८.०२ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये ९० हजार २३ पुरुष व ८१ हजार ५१ महिला, तर इतर ७, अशा एकूण १ लाख ७१ हजार ८१ मतदारांचा समावेश होता.
दरम्यान, सायंकाळपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली.

जेवणावळीमुळे मतदारांचा उत्साह
पुर्व हवेलीत अनेक ठिकाणी इच्छुकांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर तीर्थयात्रा-जत्रांचे आयोजन केले होते. तसेच मुबलक जेवणावळी, तीर्थयात्रा तसेच लक्ष्मीदर्शन यामुळे नागरिकांची अक्षरश: चंगळ झाल्याने मतदानातही हा उत्साह दिसून आला. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती.

जिल्हा परिषद गटात झालेले मतदान आकडेवारी चौकट

लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गट
एकूण मतदान : ३७१०४,
झालेले मतदान : २८३६५ - सरासरी ७६.४४
केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गट
एकूण मतदान : ३८९२४,
झालेले मतदान : २७५९४ - सरासरी ७०.८९ टक्के
उरुळीकांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गट
एकूण मतदान : ३७७२५,
झालेले मतदान : २२६५४ - सरासरी ६०.०५ टक्के
थेऊर-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट
एकूण मतदान : ४०७६७,
झालेले मतदान : ३०७४० - सरासरी ७५.६८ टक्के
लोणीकाळभोर-कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गट क्रमांक ४१
एकूण मतदान : ५१३३६, झालेले मतदान : २९४०२ - सरासरी ५७.२५ टक्के
खेडशिवापूर-खानापूर जिल्हा परिषद
एकूण मतदान : ४५६७७,
झालेले मतदान : ३२२४६ - सरासरी ७०.५९ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT