केसनंद, ता. ५ : वढू खुर्द (ता. हवेली) येथील रामनगर परिसरात चारचाकी मोटार मागे घेत असताना चाकाखाली येऊन आठ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी मोटार चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मैराबी रसुलसाब बळीगर (रा. लोणीकंद, मूळ गाव कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक भरत नेहेते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी एक मजूर कुटुंब शुक्रवारी (ता. ३) सकाळी तेथे आले होते. यावेळी समोर असलेल्या पत्र्याच्या वाहनतळामध्ये साडीच्या झोक्यात एक लहान मूल झोपले होते. तर मैराबी खेळता खेळता तेथेच झोपी गेली होती. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास एक मोटार (एम.एच. १२ एन ई. ६४२७) तेथे आली ती लावण्यासाठी चालकाने मागे घेतली असता झोपलेल्या मैराबीच्या डोक्यावरून मागील चाक गेले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने वाघोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी लालासाहेब कालेगार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.