पुणे

शिवरायांच्या नावाला साजेसं शासनाचं काम

CD

केसनंद, ता. १५ : ‘`विकसित भारत-२०४७’ संकल्पाप्रमाणेच ‘विकसित महाराष्ट्राच्या’ संकल्पपुर्तीच्या दृष्टीने समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी योजना शासन राबवीत आहे. त्याअनुषंगाने लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेत मागील दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं काम राज्य शासनाच्या वतीने केले गेले आहे,’’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लोणीकंद (ता. हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, राजेंद्र गावडे, दीपाली गव्हाणे, स्वाती पाचुंदकर, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, अनिल सातव, रत्नामाला सातव, पंचायत समिती सदस्या मोनिका कंद, राणी वाळके, सरपंच सुप्रिया कंद आदी उपस्थित होते.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवसखी योजनेअंतर्गत २ हजार २०० महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरते भांडवल देण्यात येत आहे. या योजनांची पुणे विभागातही अंमलबजावणी करण्याची सूचनाही मंत्री बावनकुळे यांनी विभागीय आयुक्तांना केली. बावनकुळे यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉपचे वितरणही करण्यात आले.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी
मंत्री बावनकुळे यांनी प्रत्येक स्टॉलचा आढावा घेताना या स्टॉलमधून नागरीकांना कशा प्रकारे फायदा मिळणार आहे, याबाबत अनेक स्टॉलधारक अधिकाऱ्यांना याबाबतचे उत्तरच देता न आल्याने मंत्री बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करीत शिबीरात स्टॉलवर आलेल्या प्रत्येक अर्जावर सायंकाळपर्यंत निर्णय घेत शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

महसूलमंत्र्यांनी दिलेली आश्वासने
- ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत लवकरात लवकर बैठक घेणार.
- भामा आसखेडबाबतचे शेरे काढण्याच्या कार्यवाहीसाठी पुढच्या १५ दिवसांत बैठक घेणार.
- वढू खुर्द (ता. हवेली) येथील ७/१२ वरील भोगवटादार वर्ग २ शेरा रद्द करून संपूर्ण गावाचा ७/१२ अनब्लॉक करण्याबाबत ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत लवकरच देवस्थान इनाम जमिनींच्या निर्णयासाठी कायदा करणार.
- लोणीकंद येथील १५० एकर जागेच्या रस्त्यांचा प्रश्न सलोखा योजनेद्वारे सोडवणार.
- लोणीकंद येथील सार्वजनिक कामासाठी शासकीय जागा देण्याचा प्रयत्न करणार.
- पाणंद रस्त्यांबाबत निर्णय घेण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा लावण्याबाबत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, त्यासाठी मोजणी व रस्तेही मोफत करणार. हा उपक्रम राज्यभरात लागू करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT