केडगाव, ता. ८ : रायरेश्वरापासून सुरू झालेल्या ग्राहक जनजागृती आनंद यात्रेचे केडगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. यावेळी पदयात्री घनश्याम केळकर यांची पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून हलगीच्या तालावर केडगावच्या बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे दौंड तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होते. या मिरवणुकीच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण होण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. ग्राहक पंचायतीचे दौंड तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद शितोळे, उपाध्यक्ष राजेंद्र शेलार, पोलिस उपनिरीक्षक किशोर वागज, अशोक हंडाळ, रामभाऊ रूपनवर, नामदेव होले, पुणे जिल्हा सदस्य राहुल सातपुते, सदस्य नामदेव जठार, प्रभाकर ताकवणे, संदीप सातपुते, विलास लोंढे, वैभव ताकवणे, अशोक निंबाळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी ज्येष्ठ व्यापारी बाबू कांबळे, किसन भागवत, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. भोर, वेल्हा, मावळ, खेड, आंबेगाव जुन्नर शिरूर या मार्गे ही यात्रा दौंड तालुक्यातील केडगाव येथे पोहोचली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि बारामतीची भूमिपुत्र सोशल फाउंडेशन यांनी या यात्रेचे आयोजन केले आहे. ही एकूण ८०० किलोमीटरची ही पदयात्रा असून याद्वारे ग्राहकांचे हक्क लोकांना समजावून देण्याचे काम केले जात आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला जात आहे. या पुढील काळात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर या तालुक्यांचा दौरा करून ही ग्राहक जनजागृती आनंदयात्रा २५ डिसेंबरला पुणे येथे सांगता होईल.
4102
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.