पुणे

वाखारीत रोबोटिक्स स्पर्धांचे आयोजन

CD

केडगाव, ता. २१ : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दौंड तालुक्यात प्रथमच जिल्हास्तरीय आंतरशालेय विज्ञान आणि रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २०५० मधील आधुनिक भारत ही या स्पर्धेची विशेष थीम असून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला, संशोधन वृत्तीला आणि तंत्रज्ञान कौशल्याला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहतात. जागतिक स्तरावर विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश संशोधन क्षेत्रात वेगाने होत असलेल्या प्रगतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा लहान गट - चौथी ते सातवी तर मोठा गट - आठवी ते दहावी दोन या गटांमध्ये आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथमच येथे भव्य एअर शो आयोजित केला आहे.
स्पर्धेतील प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी डॉ. होमी भाभा अनुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची दुर्मिळ संधी आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येणार आहे. रँचो गुरूकुल शाळा (एसफोरजी हॅाटेलमागे) वाखारी (ता. दौंड) येथे ही स्पर्धा होईल. सहभाग नोंदविण्याची २५ फेब्रुवारी अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी 92708 33239 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT