पुणे

कार्यवाहीच्या आश्‍वासनानंतर ॲड. वेताळे यांचे उपोषण मागे

CD

केडगाव, ता. १२ : केडगाव (ता. दौंड) येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील विविध तक्रारीबाबत पुणे येथे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती उपोषणकर्ते ॲड. श्रीनाथ वेताळ यांनी दिली. १५ दिवसांत अहवाल आल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करताना मुद्रांक शुल्क बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात कमी केले जाते. ऑगस्ट २०२५ मध्ये अशाच एका दस्तामध्ये दीड कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण वेताळ यांनी उघडकीस आणले होते. याच कार्यालयात बेकायदेशीरपणे एक दोन गुंठ्याचे खरेदीखत केले जात आहेत. याबाबत तक्रार करूनही वेताळ यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी पूणे येथील विधान भवनसमोर उपोषण सुरू केले होते. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने नोंदणी उप महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांना १५ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश देत एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

Mamata Banerjee Exit Poll Reaction : ममता बॅनर्जींचा मोठा दावा! 'एक्झिट पोल्स' पुन्हा एकदा फेल ठरणार; तृणमूल काँग्रेसला मिळणार 226 पेक्षा जास्त जागा

SCROLL FOR NEXT