पुणे

‘एक घर एक झाड’ संकल्पनेतून १०० आंब्यांच्या रोपांचे वाटप

CD

निमगाव केतकी, ता.२ : शेळगाव (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे व ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या संकल्पनेतून मायेची सावली अभियानाच्या अंतर्गत ‘एक घर एक झाड’ या संकल्पनेतून सोमवारी (ता. १) कृषी दिनानिमित्त १०० रोपे ३०० कुटुंबांना वाटप करण्यात आली.


सरपंच ऊर्मिला लक्ष्मणराव शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन महादेव खराडे व डॉक्टर नीलेश शिंगाडे यांनी केशर आंब्याची रोपे संत मुक्ताबाई मंदिरासमोर ३०० कुटुंबाला केशर जातीच्या आंब्याच्या रोपांचे वाटप केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे आंब्याची रोपे मिळाली आहेत त्यांनी काळजीपूर्वक निगा राखावी, असे आव्हान सरपंच शिंगाडे यांनी केले.

यावेळी छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप, माजी सरपंच रामदास शिंगाडे, समता परिषद तालुकाध्यक्ष राहुल जाधव, धनाजी ननवरे, ग्रामपंचायत सदस्य पंडित ननवरे, प्रशांत भुजबळ, सागर वाघमोडे, विलास भांगे, तात्या शिंगाडे, सोमनाथ शिंगाडे, अमोल माने, सचिन शिंगाडे, प्रवीण कुंभार, दीपक पळसे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


02278

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT