पुणे

कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू

CD

निमगाव केतकी, ता. २७ : दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मागील एक वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याच्या विक्रीला प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय त्वरित घ्यावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
कांद्याला कमीत कमी प्रतिकिलो २५ रुपये दर मिळाला तर त्याचा खर्च निघतो सध्या तो प्रति किलो दहा ते बारा रुपये एवढा कवडीमोल दराने विकत आहे. त्यामुळे उत्पादकात तीव्र संताप आहे.
कांदा उत्पादक शेतकरी दर नसल्यामुळे अडचणीत आल्यानंतर शासनाने २०२२-२३ यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान दिले होते. मागील एक वर्षापासून कांद्याला दर नसल्यामुळे उत्पादक पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडल्या असल्याने शासनाने या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे.


मागील वर्षी मे महिन्यात एक एकरातील कांदा काढला दर नसल्यामुळे तो चाळीत ठेवला. दराची वाट पाहण्यात २२५ पिशव्यांतील ७० पिशव्या खराब झाल्या. लागवडीपासून काढणीपर्यंत एक लाख रुपये खर्च झाला. कांदा वर्षभर सांभाळला. मागील जानेवारी महिन्यात राहिलेला कांदा विकला. त्याचे फक्त ४० हजार रुपये हातात आले. ६० हजार रुपये तोटा आला. शेतकऱ्यांनी हा तोटा कुठून भरून काढायचा?
-विजय माने, कांदा उत्पादक शेतकरी, पिटकेश्वर

मागील वर्षाचा कांदा दर नसल्यामुळे साठवून ठेवला. दराची वाट पाहण्यात निम्मा नसला निम्मा विकला. एकराला नव्वद खर्चाला आला. कांद्याचे वीस हजार हातात आले. कांद्याला कमीत कमी २५ रुपये दर मिळाला तर खर्च निघतो. दहा व बारा रुपयांनी शेतकऱ्यांना किती तोटा सहन करावा लागत असेल याचा शासनाने विचार करून शेतकऱ्यांना किमान क्विंटलला एक हजार रुपये तरी अनुदान द्यावे तरच कांदा उत्पादक शेतकरी टिकेल.
तुकाराम भोंग, कांदा उत्पादक शेतकरी, गोतोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्यसरकारकडून ५० लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT