पुणे

काशीग येथे आरोग्य शिबिर, पुस्तक वाटप

CD

कोळवण, ता. २० : काशीग (ता. मुळशी) येथे कृष्णाराव कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मधुमेह, मुतखडा, हाडांचे विकार, रक्तदाब, हृदय विकार, मूळव्याध, लहान मुलांचे आजार, संधीवात, किडनी, कर्करोग, डोळ्यांचे विकार, वंध्यत्व आदी आजारांवर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व निदान करण्यात आले. गावातील सुमारे १७० महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ७० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने २५० जणांना मोफत प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप झाले. तसेच १२० महिलांना साड्या व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. ‘आरपीआय’चे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम, मावळ तालुका प्रमुख लक्ष्मण भालेराव, युवक अध्यक्ष अंकुश सोनवणे, दशरथ गायकवाड, ज्ञानप्रद ग्रंथालय कोळवणचे संस्थापक अध्यक्ष संजय जाधव, शिवसहकार सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डफळ आदी या वेळी उपस्थित होते. प्रिस्टाईन आयुर इंडिया चॅरिटी फाउंडेशनचे डॉ. प्रवीण बढे व त्यांच्या पथकातील सहकारी डॉक्टर, नर्सेस यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. काशीगच्या सरपंच वर्षा कदम, उद्योजक राहुल कदम, ॲड. रोहित कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT