पुणे

करमोळी परिसरातील हातभट्टीवर कारवाई

CD

कोळवण, ता. १० : करमोळी (ता. मुळशी) येथील बेकायदा गावठी हातभट्टीवर पौड (ता. मुळशी) पोलिसांनी कारवाई केली.
करमोळी येथे मुळा नदी पात्रालगत काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना मिळाली. त्यांनी तत्काळ दोन पोलिस पथके तयार करून करमोळी गावात मुळा नदीच्या दोन्ही बाजूने छापा टाकला. त्याठिकाणी तीन व्यक्ती गावठी हातभट्टी दारू तयार करत होते. पोलिस आल्याचे पाहताच त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. परंतु, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. या कारवाईमध्ये ४ लाख २० हजार रुपये किमतीचे १६ हजार ८५० लिटरचे ९ बॅरल, १४० लिटर हातभट्टीची तयार दारू, तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे, भांडी, २ अश्‍वशक्ती‍ची पाण्याची मोटार, १ ॲक्टिव्हा दुचाकी, असा एकूण ४ लाख ८८ हजार रकमेचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम महिंद्रा बिरावत (रा. वारू, ता. मावळ), विर राम बिरावत (रा. करमोळी), नितीन देवेंद्र बिरावत (रा. करमोळी) यांना अटक करण्यात आली असून, कच्चे रसायन दारू जागेवर नष्ट केली.
या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी, सहायक फौजदार बाबा शिंदे, संतोष कुंभार, पोलिस हवालदार मनोज कदम, अनिता रवळेकर, पोलिस नाईक सचिन सलगर, अक्षय यादव, रेश्मा साठे यांनी सहभाग घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

SCROLL FOR NEXT