कोळवण, ता.३ : कुळे (ता. मुळशी) येथे लुपिन फाउंडेशनचा ३६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शेतकरी व दुग्धव्यावसायिकांचा प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास मुळशी, राजगड व जुन्नर तालुक्यातील २० गावातील २५० शेतकरी उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय काम केलेल्या दुग्ध व्यवसाय, शेती व सिंचन, कुकूटपालन, शेळीपालन व स्वयंरोजगारामधील लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी तुषारा शंकर यांनी संस्थेच्या नवीन धोरणाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी हवामान बदल व त्याचा शेतीवर होणारा परिणाम तसेच कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी श्वसन संस्था व सुदृढ हृदयाबाबत मार्गदर्शन केले. योगेश राऊत यांनी शाश्वत उपजीविका विकास कार्यक्रमाअंतर्गत राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच या कार्यक्रमामध्ये ॲटलस कोपको इंडिया लिमिटेड व लुपिन फाउंडेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पातील दुग्ध व्यवसाय, फळबाग लागवड व कुक्कुट पालन साठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण करण्यात आले.
फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक संदीप झणझणे यांनी प्रस्तावना केली. प्रताप मोटे यांनी आभार मानले. राजेश मारणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी व्यंकटेश शेटे, संदीप झणझणे, रूपेश सावंत, बाळासाहेब बोऱ्हाडे, संजय दिंधळे आदी उपस्थित होते.
01366
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.