कोळवण, ता. २ ः चाले (ता. मुळशी) येथील पुलाचे बांधकाम आजूनही काही प्रमाणात होणे बाकी आहे, परंतु वाहनचालकांची होणारी गैरसोय व पर्यायी मार्गाने प्रवास करताना होणारे हाल लक्षात घेऊन मंगळवारी (ता. १) पूल फक्त दुचाकी व हलक्या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खुला केला आहे.
हा पूल सुरू झाल्याने पौड, कोळवण, काशिग मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कोळवणकडील वाहनचालकांना चाले- मुगावडे- घोटावडे गाव हनुमान चौक ते घोटावडे फाटा मार्गे पुणे किंवा पौड असा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार नाही. यामुळे वाहनचालकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
चाले पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने कामगार दुग्ध व्यावसायिक शेतकरी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना या मार्गावर प्रवास करणे सुलभ झाले आहे. येथील पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही म्हणून खासदार सुप्रिया सुळे, आमदार शंकर मांडेकर, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी स्वतः पुलाची पाहणी करून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बांधकाम विभागास पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या होत्या.
याबरोबरच कोळवण खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी सतत पाठपुरावा केला होता. पुलाचे काम पूर्ण व्हावे म्हणून अगदी भर पावसात भिजत सर्व पक्षीय आंदोलन देखील झाले होते. तसेच ‘सकाळ’ने देखील पुलाच्या बांधकामाबाबत अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सतत वार्तांकन करून पुलाच्या बांधकामाचा मुद्दा सतत उचलून धरला होता.
अजूनही पुलाचे ही कामे अपूर्ण
पुलावरील क्युअरिंग वेअर (धावपट्टी वरील डांबरीकरण).
कोळवणकडून व पौडकडून येणाऱ्या रस्त्यावरील पुलास जोडणारी दोन्ही बाजूकडील धावपट्टी.
रस्त्यावरील व पुलावरील साफसफाई.
पुलाच्या कामासाठी आलेल्या कामगारांना राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ऊभी केलेली पत्राची शेड अर्ध्या रस्त्यात आहेत.
अपूर्ण सुरक्षा कठडे व त्यांच्या रंगरंगोटीचे कामे.
चाले पूल दुचाकी व चारचाकी (हलकी वाहने) वाहनांसाठी खुला केला आहे. तरी येथील पुलाचे काम अद्यापही बाकी असल्याने अवजड वाहनांना येथून प्रवेश बंद आहे. तसेच येथून प्रवास करताना वाहनचालकांनी सुरक्षितपणे प्रवास करावा.
- विनय जाधव, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.