पुणे

चालेतील पूल खुला झाल्याने कोळवण परिसरास दिलासा

CD

कोळवण, ता. २१ : चाले (ता. मुळशी) येथील वळकी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेला पूल नुकताच खुला करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत झाल्याने कोळवण खोऱ्यातील सोळा गावांतील ग्रामस्थ तसेच प्रवाशांनी समाधान केले आहे. पुलाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

चाले मुगावडे घोटावडे घोटावडे फाटा हनुमान चौक घोटावडे फाटा पुणे किंवा भरे दारवली मार्गे पौड, अशी वळसा मारून वीस किलोमीटर सतरा ते अठरा किलोमीटर अंतर कापून कोळवण भागातून प्रवास करावा लागत होता. पूल सुरू झाल्याने ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे वाटून आंनद व्यक्त केला.
यावेळी सुनील चांदेरे,अंकुश मोरे, श्रीकांत कदम, रवींद्र कंधारे, शांताराम इंगवले, कालिदास गोपालघरे, दीपक करंजावणे, विनायक ठोंबरे, शिल्पा ठोंबरे, वैशाली सणस, नीता नांगरे, सुखदेव मांडेकर, पोपट दुडे, नामदेव टेमघरे, बबन धिडे, माऊली साठे, नितीन साठे, शरद केदारी,चाले सरपंच अरुणा केदारी तसेच कोळवण खोऱ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चाले (ता. मुळशी) : पुलावरून सुरळीत झालेली वाहतूक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: इंग्लंडच्या संघात ८ वर्षांनी 'त्या' गोलंदाजाचे पुनरागमन! मँचेस्टर कसोटीसाठी दोन दिवस आधीच प्लेइंग-११ जाहीर

Nalasopara Murder: खळबळजनक! नालासोपारात 'दृश्यम' सारखी घटना; पतीचा मृतदेह घरातच पुरला अन् वरून फरशीही बसवली, मात्र...

Jagdeep Dhankhar Resigns: मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने दोन प्रकरणात ईडीला फटकारले; ''तुमचा वापर कशासाठी केला जातोय?''

Ration Card: आता 'या' नागरिकांचे रेशन होणार कायमचे बंद, पहा यादीत तुमचं तर नाव नाही ना? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT