कोळवण, ता. २६ : भोर विधानसभा मतदारसंघातील ११ शाळांच्या १७ वर्ग खोल्या व ५१ शाळांच्या दुरुस्तीसाठी, तसेच १ शाळेच्या मुला- मुलींच्या शौचालय बांधकाम कामांकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद निधीअंतर्गत ५ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये मंजूर झाला आहे. त्यामुळे भौतिक सुविधा उपलब्ध होऊन या शाळांचे रुपडे पालटणार आहे, अशी माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
निधी मंजूर झालेल्या शाळांची नावे व कंसात रक्कम (रुपयांत)
मुळशी तालुका- शाळा दुरुस्ती- चिखलगाव (४ लाख), सावरगाव (४ लाख), खांबोली (५ लाख), शेळकेवाडी (५ लाख रुपये), गवारवाडी- पिंपळोली) (५ लाख रुपये), डावजे (५ लाख रुपये), जांभुळकरवाडी- बार्पे (६ लक्ष रुपये), नाणेगाव- (४ लाख), वेगरेवाडी (५ लाख रुपये), वर्ग खोली बांधकाम- जांबे १ (१५ लाख रुपये), मुळशी खुर्द (२८ लाख रुपये), विसाघर (१५ लाख रुपये).
भोर तालुका- वर्ग खोली बांधकाम- मोहरी खुर्दवाडी (१५ लाख), न्हावी ३ (४२ लाख), म्हाकोशी (१५ लाख), ससेवाडी २ (२८ लाख), खुलशी (१५ लाख), नऱ्हे २ (२८ लाख), शाळा दुरुस्ती- दत्त मंदिर कासुर्डी गुमा शाळा (३ लाख २५ हजार), सावरदरे (९ लाख), वागजवाडी (७ लाख), भांबावडे (५ लाख ५० हजार), आस्कवडीवाडी (९ लाख), कांबरे खे.बा. (७ लाख), कारंगुण (६ लाख), बुरूडमाळ (५ लाख), जयतपाड (५ लाख), शिंदेवाडी (५ लाख रुपये), आंबेघर (४ लाख), आंबाडे (३ लाख), माजगाव (५ लाख), कुंबळे (४ लाख), राऊतवाडी (५ लाख), कासुर्डी गु.मा. (७ लाख), नसरापूर (८ लाख), कुंड (४ लाख), दामगुडेवाडी (६ लाख), भानुसदरा (८ लाख). धारांबे शाळा मुला मुलींचे शौचालय बांधकाम करणे (१० लाख)
राजगड तालुका- वर्ग खोली बांधकाम- धनगर वस्ती- विंझर (१५ लाख रुपये), घावर (२८ लाख), शाळा दुरुस्ती- डाळवाडी (५ लाख), वाजेघर बुद्रुक (४ लाख ५० हजार), मंजाई आसनी (९ लाख), मळेकरवस्ती (८ लाख), कातवडी (९ लाख), केतकावणे (५ लाख), मार्गासनी (६ लाख), माजगाव (७ लाख), कोंढाळकरवाडी (७ लाख), पाल बुद्रुक (४ लाख ५० हजार), चऱ्हाटवाडी (४ लाख), नाळवट (६ लाख), एकलगाव (७ लाख), खामगाव (६ लाख), कोशिमघर (७ लाख), अंबवणे (५ लाख), दादवडी (६ लाख), हरिजनवस्ती (८ लाख), दरडिगेवस्ती (७ लाख), साखर (४ लाख), सुरवड (६ लाख), आसणी दामगुडा (५ लाख).