पुणे

काशिग येथे शिवजयंतीनिमित्त फळझाडांच्या रोपांचे वाटप

CD

कोळवण, ता. ८ ः काशिग (ता. मुळशी) येथे ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
गुरुवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिववंदनेमुळे परिसरात शिवमय वातावरण झाले होते. त्यानंतर किशोर कोकाटे महाराज यांनी आपल्या कीर्तन सेवेतून शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शिवप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थिती लावून शिवरायांना मानाचा मुजरा केला. उपस्थित मान्यवरांना पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्षारोपण करण्यासाठी विविध प्रकारच्या फळझाडांची व इतर वृक्षांचे रोपे वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसहकर सेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, माजी सरपंच नवनाथ टेमघरे, आरपीआय युवक अध्यक्ष राहुल कदम, माजी उपसरपंच लहू टेमघरे, नामदेव तिडके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन टेमघरे, माजी अध्यक्ष शाहिदास डफळ, राम टेमघरे, अमोल शिंदे यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT