शिक्रापूर, ता. १७८ : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली २२ महिने न्यायालयीन कोठडीत असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केल्याने नुकतीच त्यांची मुक्तता झाली. त्यांच्यावर दाखल असलेल्या चारही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला असून, या प्रकरणातील अटक असलेले सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर झाला आहे.
शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर २६ एप्रिल २०२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांना सोबतीने गुन्हे घडल्याच्या तक्रावरून बांदल यांच्यासह त्यांचे काही जवळचे मित्र व बँक अधिकारी यांना अटक झाली होती. पुढील काळात अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाले होते व एकूण ४ गुन्हे बांदल यांच्याशी संबंधित दाखल होते. या प्रकरणाशी संबंधित सर्वांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यावरूनच बांदल यांची सुटका झाल्याची माहिती वकील प्रतिनिधी अॅड. आदित्य सासवडे यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.