पुणे

तीर्थस्थळ ‘क’ दर्जा देणाऱ्या बापटांना केंदूरकरांची श्रद्धांजली

CD

शिक्रापूर, ता. ३१ ः संतश्रेष्ठ कान्हूराज महाराज पाठक यांच्या निमित्ताने केंदूर (ता. शिरूर) गावाला तीर्थस्थळ ‘क’ दर्जा मिळवून देण्याचे काम तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्याने केंदूरकर त्यांना कायमच स्मरणात ठेवतील, असे म्हणत केंदूर येथे सरपंच सूर्यकांत थिटे व उपसरपंच विठ्ठल ताथवडे यांनी गावाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली.

दिवंगत बापट यांच्या निधनाची बातमी केंदूर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीच्या वेळीच समजल्याने बैठकीतच गावाच्या वतीने सरपंच, उपसरपंच यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, केंदूर तीर्थस्थळ ‘क’ दर्जासाठीची मागणी केंदूरकरांची गेली २५ ते ३० वर्षांची होती. बापट पालकमंत्री होताच त्यांच्या चौथ्या जिल्हा आढावा बैठकीत सदर मागणी ६ वर्षांपूर्वी मंजूर केली होती. याबाबत गावातील वारकरी सांप्रदायानेही हळहळ व्यक्त केली. दरम्यान, संतश्रेष्ठ कान्हूराज पाठक महाराजांचे वंशज सुधाकर राजपाठक यांनीही शोक व्यक्त केला.
-----------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT