पुणे

शिरूरमध्ये भाजप नेमणार दोन तालुकाध्यक्ष

CD

शिक्रापूर, ता. ३१ : मजबूत संघटनेचा तोरा मिरवूनही सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या शिरूर भाजपने (शिरूर मंडल) आता आगामी विधानसभा जिंकण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचसाठी नव्या दमाचा शिरूर भाजप तालुकाध्यक्ष निवडण्याची प्रक्रीया गुरुवारी (ता. १) होणार आहे. या मुलाखती पक्ष प्रभारी राजेश पांडे हे लोणीकंद (ता. हवेली) येथे घेणार असून, यातच आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूरच्या ३९ गावांसाठी (शिरूर बेट मंडल) तालुकाध्यक्षही निवडला जाणार आहे.
तत्कालीन भाजप आमदार बाबूराव पाचर्णे यांनी तब्बल ३ हजार कोटींची विकासकामे करून सन २०१९ मध्ये जोरदारपणे आपली उमेदवारी श्रेष्ठींकडून खेचून आणली. मात्र, ‘आमचे संघटन सर्वात शक्तिमान असे मोठ्या तोऱ्यात म्हणणाऱ्या शिरूर भाजपच्या गटबाजीच्या राजकारणाने पाचर्णे हे तब्बल ४१ हजारांनी पराभूत झाले. त्यात शिरूर भाजपचा एक गट राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीच कार्यरत आहे,’ अशी चर्चा गेली कित्येक वर्षे चालू आहे. पर्यायाने शिरूर-हवेली मतदारसंघात प्रदेश भाजपला सन २०२४ मध्ये त्यांना हवा तो आमदार निवडून आणायचा असेल; तर आता शिरुरची गटबाजी संपवून अपप्रवृत्तीचे पदाधिकारी दूर ठेवून ताकदवान तालुकाध्यक्ष नेमणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रदेश भाजपसाठी शिरूरमध्ये जे काही पर्याय आहेत, त्यातील इच्छुकांची संघटन करण्याची क्षमता, सोशल मिडीयाबाबत उत्तम समज, सर्व गटांना एकत्रित ठेवण्याचे कसब, पक्ष कार्यक्रम आणि सरकार म्हणून केलेली कामे प्रभावीपणे जनतेसमोर मांडण्याचे कसब आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच्या संपर्कात नसणारा तालुकाध्यक्ष, हे निकष हमखास ठेवावे लागणार आहेत.

शिरूरमध्ये भाजपचे काही पदाधिकारी ग्रामपंचायतींसह विविध सरकारी विकासकामांसाठी कंत्राटदार आणि त्यांचे छुपे भागीदार म्हणून सक्रिय आहेत. या शिवाय एक पदाधिकारी तर थेटपणे शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येच सक्रिय आहे. काही पदाधिकारी थेटपणे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी एमआयडीसीतील विविध ठेक्यांमध्येही भागीदारी करत आहे. हा सर्व शिरूर पॅटर्न संपविणे हेही भाजप तालुकाध्यक्ष नेमण्याच्या निकषात महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

प्रमुख इच्छुक
विद्यमान तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, तालुका सरचिटणीस माऊली बहिरट, माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ, राजेंद्र ढमढेरे हे शिरूर मंडलसाठी; तर अनिल नवले, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सावित्रा थोरात, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, विशाल खरपुडे, सतीश पाचंगे हे शिरूर-बेट मंडलसाठी (३९ गावे) प्रमुख इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT