पुणे

मोटारीने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

सणसवाडी, ता.१९ : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूरच्या बजरंगवाडी परिसरात (ता.शिरूर) भरधाव मोटारीने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे वैभव विठ्ठल रोमन (वय ३८, सणसवाडी, ता.शिरूर) यांचा गंभीर जखमी झाल्याने रविवारी (ता.१७) मृत्यू झाला. यामुळे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हे बजरंगवाडी येथून दुचाकीवरून (एम एच १६ एक्स ४९६९) शिक्रापूरकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून पुणे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटारीने वैभव यांच्या दुचाकीला धडक दिली. जखमी गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी वैभव यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. अपघातानंतर मोटारचालक फरार झाला.
याप्रकरणी वसंत अप्पासाहेब खेंगरे (वय ३६, रा.बकोरी रोड, वाघोली, ता.हवेली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहेत.


04211

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT