पुणे

शिक्रापूर येथील बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

CD

शिक्रापूर, ता.३० : येथील अजित रसाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्य़ांनी तीन तोळे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पाटवस्ती परिसरात राहणारे अजित रसाळ हे दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून आपल्या मूळ गावी आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. ते गावाला गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच्या पहाटे अजित यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे आणि दरवाजात चिखलाच्या पावलांचे ठसे दिसत असल्याचे जवळच राहणारे विकास मदने यांना दिसले. त्यांनी या बाबतची माहिती तत्काळ अजित यांना मोबाईलवरून दिली. त्यानंतर अजित हे शिक्रापुरात आले व त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांच्या घराच्या दरवाजाच्या गेटसह दरवाजाचे कुलूप तोडून कुणीतरी घरात प्रवेश केला होता व घरात जाऊन कपाटाचे कुलूप तोडून, कपाटातील तब्बल तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे दिसून आले. याबाबत अजित महादेव रसाळ (वय ३०, रा.पाटवस्ती, शिक्रापूर, ता.शिरू मूळ रा.लाखेवाडी, ता.इंदापूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT