शिक्रापूर, ता. २ : करंदी (ता. शिरूर) येथील गोरक्ष नथूजी ढोकले (वय ५३) यांनी गावातीलच शाळेजवळील झुडपातील एका झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गोरक्ष ढोकले हे घरातून बाहेर गेल्यानंतर सायंकाळ उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी त्यांचा गावामध्ये शोध घेतला. त्यावेळी त्यांची दुचाकी शाळेजवळ उभी दिसल्याचे दिसले. ढोकले कुटुंबीयांनी आजूबाजूला पाहणी केली असता त्यांनी काटवनात एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत खंडू शिवाजी ढोकले (वय ५७, रा. करंदी) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यास खबर दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.