पुणे

मोटारीत गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्यांवर गुन्हा

CD

शिक्रापूर, ता. २८ : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरूर)मधील चाकण चौक परिसरात गुरुवारी (ता. २७) रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून मोटारीमध्ये मोठ्याने गाणी लावून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तीन युवकांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
प्रशांत अनिल रसाळ (वय ३०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), सौरभ अजित दरेकर (वय २७), मनोज सुरेश नवले (वय २९, दोघेही रा.शिक्रापूर, ता. शिरूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पोलिस शिपाई रामदास सतीश जाधव (वय ३२, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, साहाय्यक उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलिस शिपाई रामदास जाधव हे गस्त घालत असताना, पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील चाकण चौक परिसरात एका मोटारी (एमएच १२ व्हीसी ८२००)ची दारे उघडी ठेवून त्यात मोठ्याने गाणी लावून काही युवक दारूच्या नशेत रस्त्यावर नाचत असल्याचे पोलिसांना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांना समज देत घरी जाण्यास सांगितले. यावर हे युवक काही काळ निघून गेले; मात्र पुन्हा काही वेळाने हे सर्व युवक पुन्हा त्याच ठिकाणी येऊन त्यांच्या मोटारीमध्ये मोठ्याने गाणी लावून रस्त्यावर नाचून धिंगाणा घालू लागले. यावर गस्तीवरील पोलिसांनी या तिघांनाही तत्काळ ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस हवालदार नरेंद्र गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT