पुणे

कोरेगावातील वेळ नदीमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

CD

शिक्रापूर, ता. १९ : शिक्रापूरातून शनिवारी (ता.१४) बेपत्ता झालेल्या अनिता पांचाळ (वय २५) या विवाहित महिलेचा मृतदेह कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील वेळ नदीत तरंगताना आढळला. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या गुन्ह्याचा पोलिस शोध घेत आहेत.
शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, येथील मलठण फाटा परिसरातील वल्लभनगर येथे राहणारी अनिता पांचाळ शनिवारी (ता.१४) अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत त्यांचे पती मारुती पांचाळ (वय ३७, सध्या रा.वल्लभनगर, मलठण फाटा, शिक्रापूर, ता. शिरुर, जि.पुणे, मूळ रा.भोकर, ता.भोकर, जि.नांदेड) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. उपलब्ध माहितीनुसार शिक्रापूर पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू केली. दरम्यानच्या काळात सोमवारी (ता.१६) सकाळच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील भीमा नदी पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर बेपत्ता अनिता पांचाळ यांचे पती व इतर नातेवाइकांना सदर ठिकाणी येऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. असता, सदर मृतदेह हा अनिता पांचाळ यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पंचनाम्यासाठी स्थलांतरित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन

Mumbai Viral Video: मुंबईत 2BHK फ्लॅटचं भाडं किती, इन्फ्लुएंसर तरुणीने सांगितला थक्क करणारा आकडा

Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

खरे मूर्ख तर आम्ही... अंकिता वालावलकरने सांगितली सुरजची स्ट्रॅटेजी; त्याने स्वतःला मुद्दाम गरीब दाखवलं...

Maharashtra SSC Exam 2026: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांनो, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

SCROLL FOR NEXT