पुणे

हिवरे कुंभार शाळेतील सात विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

CD

शिक्रापूर, ता. ६ : शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम स्थानावर असलेल्या हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गामधील सात विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकाच्या उपस्थितीत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला.
पिंपळे-धुमाळ (खालसा) जिल्हा परिषद शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दबदबा आहे. गेल्या ४० वर्षांत तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केल्याचे या शाळेचे महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे. याच शाळेत गुरुवारी (ता. ५) हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील अल्पवयीन आठ विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गातीलच एका विद्यार्थ्याने निर्दयीपणे काठीने बेदम मारहाण केली. ही घटना गावात समजल्यावर तत्काळ संतप्त पालकांनी ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी शाळेत धाव घेतली. याच वेळी संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीत शिक्रापूर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर शाळेतील सर्व शिक्षकांना घेऊन ग्रामस्थांनी शाळेमध्ये बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी काही विद्यार्थ्यांना बैठकीत बोलावले असता, येथील शिक्षकांच्या तक्रारीचा पाढाच विद्यार्थ्यांनी कथन केला. दरम्यान, ज्या एका विद्यार्थ्याने काठीने मारहाण केली त्या विद्यार्थ्याची संपूर्ण शाळेतच मोठी दहशत असून त्या विद्यार्थ्याला शिक्षक पाठीशी घालत असल्याचा प्रकारही यावेळी समोर आला. ग्रामस्थांच्या बैठकीवेळी संबंधित विद्यार्थी व त्याचे पालक गैरहजर असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे व पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलिस शिपाई नारायण वाळके, राम जाधव, नारायण सानप, योगेश आव्हाड, गणेश केंद्रे यांनी शाळेमध्ये धाव घेतली असता विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे मारहाणीचा प्रकार सांगत मारहाण झाल्याचे व्रण दाखवले.

मुलांच्या दप्तरात एनर्जी ड्रिंक्स, तंबाखू अन...
ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामस्थांनी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराची झडती घेतली असता, त्यात शीतपेयांच्या बाटल्या, एनर्जी ड्रिंक्स, तंबाखू आदी सारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळल्याने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली.


धुमाळ नामक शिक्षकांच्या समोर हा प्रकार घडल्याचे पालक म्हणत आहेत तर शिक्षक बाहेर होते असे त्यांचे म्हणणे आहे. पण झालेला प्रकार गंभीर आहे. आम्ही तत्काळ चौकशी सुरू केलेली आहे. धुमाळ यांची तत्काळ बदलीची मागणी ग्रामस्थांची असून त्यावरही योग्य निर्णय आम्ही घेत आहोत. या प्रकाराबाबत संबंधित पालकांच्या तक्रारीनुसार पोलिस कारवाई होईल.
- प्रीतम कोकणे, गटशिक्षणाधिकारी, शिरूर


घडलेला प्रकार अत्यंत गंभीर व चिंतनीय आहे. आम्ही सर्व बाधित विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षकांना समक्ष जाऊन त्यांची चौकशी केली. याबाबत ग्रामस्थांच्या अर्जानुसार पुढील पोलिस कारवाई केली जाईल.
- सोमनाथ कचरे, सहायक पोलिस निरीक्षक, शिक्रापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT