शिक्रापूर, ता. ९ : कोरेगाव भीमा येथील एका प्रिंटिंग व्यावसायिकाकडे दरमहा २० हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अभिषेक रवींद्र गव्हाणे (रा. डिंग्रजवाडी, ता. शिरूर) याच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर पांडुरंग ढेरंगे (वय ३९, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरू) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेरंगे यांचा कोरेगाव भीमा येथे प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. आरोपी अभिषेक गव्हाणे याने ढेरंगे यांना वारंवार दूरध्वनी करून, "व्यवसाय चालवायचा असेल तर दरमहा २० हजार रुपये द्यावे लागतील," अशी मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने ढेरंगे व त्यांच्या कुटुंबाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी विशेष पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर करत आहेत.
शिक्रापूर परिसरात कोणत्याही व्यावसायिकाला गुंडांकडून त्रास दिला जात असल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कोणाचीही दहशत किंवा दादागिरी सहन केली जाणार नाही.
- दिपरतन गायकवाड, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.