पुणे

शिक्रापुरात रंगली शरीरसौष्ठव स्पर्धा

CD

शिक्रापूर, ता. १० ः शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पहिल्यांदाच पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. स्पर्धेत पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येने शरीरसौष्ठव पटूंनी सहभाग नोंदवला.
येथील वेताळ बुवा स्टेडियम येथे इव्होल्यूशन फिटनेस हब यांच्या विशेष पुढाकाराने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी झाल्या. यात स्पर्धकांनी आपली शरीरयष्टी, ताकद आणि मेहनतीचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. युवकांमध्ये फिटनेस व शरीरसौष्ठवाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला चषक व टी शर्ट देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रीतम सिंग आणि संजय चव्हाण यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करत शरीरसौष्ठव क्षेत्रातील संधी आणि योग्य प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.
याप्रसंगी यावेळी शिरूर पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे, देवा उमाप, चिंचोलीचे उपसरपंच संतोष भोसले, विजय लोखंडे, युवराज मांढरे, बापूसाहेब शिंदे, शुभम जगताप, ॲड. तेजस राऊत, शिरूर केसरी गणेश सासवडे, विवेक सातकर, पोलिस हवालदार अमोल नलगे, डॉ. योगेश बेंद्रे, रवींद्र टेमगिरे, डॉ. सुयोग ढमढेरे आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उद्योजक प्रसाद थिटे, संतोष सासवडे, प्रशांत कुंदर, सनी घारे आदींनी विशेष योगदान दिले.

05305

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून चिडला: अम्पायरसोबत वाद

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT