बारामती/काटेवाडी, ता. २४ : बारामती शहर व आसपासच्या परिसरात एका दिवसात तब्बल ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात शुक्रवारी (ता. २३) दिवसभर व रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती. तसेच शनिवारी (ता. २४) देखील काहीशा उघडीपी नंतर पुन्हा पाऊस पडला.
बारामती तालुक्यात मॉन्सून पूर्व वळवाचा पाऊस मे महिन्यामध्ये होत असतो. मात्र, या पावसाचे स्वरूप सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाच्या सरी असे असते. सध्या मॉन्सूनच्या पावसासारखी वळवाच्या पावसाची संततधार दोन दिवस बारामती तालुक्यामध्ये सुरू आहे. बारामती तालुक्यात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये एवढा सरासरी १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, होळ, आदी ठिकाणी २०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद या महिन्यामध्ये झाली आहे तर शनिवारी (ता. २४) एका दिवसातच बारामती (११७ मिलिमीटर), माळेगाव कॉलनी (५५), वडगाव निंबाळकर (७१), पणदरे (५६), बऱ्हाणपूर (६३), जळगाव कडेपठार (५५), होळ (७०.५), माळेगाव कारखाना (६८.४), मानाजीनगर (५५), सोनगाव (८३.५), सावंतवाडी (८८), मोढवे (५०), डोर्लेवाडी (७३), गुणवडी (५५), सोमेश्वर कारखाना (७७), आदी भागात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे चारा पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पावसाने जनजीवन विस्कळित केल्या असून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मे महिन्यात पाऊस झाल्याने शेतकरी देखील गोंधळात पडले आहेत.
--------------------------------------------
बारामती तालुक्यातील १ मेपासून पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये);
बारामती शहर...........१७३
उंडवडी कडे पठार...........१२८
सुपे...........१३०
लोणी भापकर...........१८४
वडगाव निंबाळकर...........१६५
पणदरे...........११२
मोरगाव...........१६८
सोमेश्वर कारखाना...........१८२.७
जळगाव कडेपठार...........२११
होळ...........२००.५
माळेगाव कारखाना...........१४३
चांदगुडेवाडी...........२३५
जळगाव सुपे...........१९८
सावंतवाडी...........१५९
मोढवे...........१५०.२
तालुक्यातील पाझर तलाव, साठवण बंधारे, वळण बंधारे आधी जलसंधारणाची कामे उन्हाळ्यामध्ये झाली होती. आता झालेल्या पावसामुळे या प्रकल्पामधून दहा ते पंधरा टक्के पाणीसाठा वाढलेला आहे, अशी माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी शुभम चरवंडे व जलसंधारण अधिकारी केशव जोरी यांनी दिली.
----------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.