काटेवाडी, ता. २१ : बारामती कृषी उपविभागातील पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि कालवा फुटीमुळे शेतजमिनींना मोठा फटका बसला. कृषी विभागाच्या अहवालानुसार, १०३ गावांमधील ९८३.२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ४ हजार ४११ शेतकऱ्यांचे ३ कोटी ८ लाख ४१ हजार ६३० रुपये इतके नुकसान झाले आहे. यामध्ये गाळ साचणे, ढिगारे जमा होणे आणि भूस्खलनामुळे जमीन गमावणे यांचा समावेश आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी दिली.
अतिवृष्टीच्या संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. इंदापूरमध्ये भूस्खलन आणि नदीच्या दिशा बदलामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली कसण्यायोग्य जमीन गमावली. शेतजमिनी पुन्हा शेतीयोग्य करण्यासाठी खर्चिक मेहनत आणि वेळ लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज, पुढील पिकाची तयारी आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जमीन पुन्हा शेतीयोग्य करण्यासाठी तत्काळ मदतीची गरज आहे. यासाठी शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मे २०२५ मध्ये बारामती उपविभागात अतिवृष्टी आणि कालवा फुटीमुळे शेतजमिनींना मोठा फटका बसला. बारामती तालुक्यात ५६ गावांमध्ये ४९५.९८ हेक्टर क्षेत्रावर गाळ साचल्याने १,८७९ शेतकऱ्यांचे ८९ लाख २७ हजार ६४० रुपये इतके नुकसान झाले. इंदापूर तालुक्यात ४२ गावांमध्ये ४४८.२५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले, ज्यामध्ये भूस्खलन आणि नदीच्या दिशा बदलामुळे ४१४.८१ हेक्टर जमीन गमावल्याने २,१७९ शेतकऱ्यांचे २ कोटी ४ लाख ५७ हजार ९९० रुपये इतके नुकसान झाले. दौंड तालुक्यात २ गावांमध्ये २६.०० हेक्टर क्षेत्र बाधित होऊन २८३ शेतकऱ्यांचे १२ लाख २२ हजार रुपये आणि पुरंदर तालुक्यात ३ गावांमध्ये १३.०० हेक्टर क्षेत्रावर ढिगारे साचल्याने ७० शेतकऱ्यांचे २ लाख ३४ हजार रुपये इतके नुकसान झाले. एकूण १०३ गावांमधील ४,४११ शेतकऱ्यांचे ३ कोटी ८ लाख ४१ हजार ६३० रुपये इतके नुकसान नोंदवले गेले.
आकडेवारी :
पुरंदर तालुका:
बाधित गावे..................३
ढिगारे हटवणे (डोंगराळ भाग)..................१३.०० हेक्टर
बाधित शेतकरी..................७०
नुकसान ..................२ लाख ३४ हजार रुपये
बारामती तालुका:
बाधित गावे..................५६
गाळ काढणे..................४९५.९८ हेक्टर
बाधित शेतकरी..................१,८७९ शेतकरी
नुकसान..................८९ लाख २७ हजार ६४० रुपये
दौंड तालुका:
बाधित गावे..................२
भूस्खलन/नदीच्या दिशा बदलामुळे जमीन नुकसान..................२६.०० हेक्टर
बाधित शेतकरी..................२८३
नुकसान .................. १२ लाख २२ हजार रुपये
इंदापूर तालुका:
बाधित गावे..................४२
गाळ काढणे..................३३.४४ हेक्टर
बाधित शेतकरी..................२७६ शेतकरी
भूस्खलन/नदीच्या दिशा बदलामुळे जमीन नुकसान..................४१४.८१ हेक्टर
बाधित शेतकरी..................१,९०३
एकूण..................४४८.२५ हेक्टर,
एकुण बाधित शेतकरी..................२,१७९
नुकसान..................२ कोटी ४ लाख ५७ हजार ९९० रुपये
एकूण:
बाधित गावे..................१०३
गाळ काढणे..................५२९.४२ हेक्टर
बाधित शेतकरी..................२,१५५
ढिगारे हटवणे..................१३.०० हेक्टर
बाधित शेतकरी..................७०
भूस्खलन/नदीच्या दिशा बदलामुळे जमीन नुकसान..................४४०.८१ हेक्टर
बाधित शेतकरी..................२,१८६
एकूण क्षेत्र..................९८३.२३ हेक्टर
एकूण बाधित शेतकरी..................४,४११
नुकसान नुकसान..................३ कोटी ८ लाख ४१ हजार ६३० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.