काटेवाडी, ता. २२ : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहीम तीव्र केली आहे. घटसर्प (हिमोरॅजिक सेप्टिसिमिया) आणि फऱ्या (ब्लॅक क्वार्टर) या दोन घातक आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी व्यापक लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय लसीकरणाची प्रगती उल्लेखनीय असून, आतापर्यंत दोन लाख २ हजार ९३७ जनावरांना घटसर्प आणि ३२ हजार ८८० जनावरांना फऱ्या लस देण्यात आली आहे. पशुधन सुरक्षित असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ३६ हजार ६७ जनावरांना घटसर्प लस देण्यात आली आहे, तर फऱ्या लसीकरणातही हाच तालुका ५ हजार ८०० जनावरांसह आघाडीवर आहे. पुणे शहरात फऱ्या लसीकरण झालेले नाही, परंतु घटसर्प लसीकरणात प्रगती दिसून येते. ही मोहीम शेतकऱ्यांच्या पशुधनाचे संरक्षण करून त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. विशेषतः इंदापूर, शिरूर आणि बारामती सारख्या तालुक्यांमध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या जनावरांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
घटसर्पाची लक्षणे (हिमोरॅजिक सेप्टिसिमिया)
(पेस्ट्युरेला मल्टोसिडा नावाच्या जिवाणू)
*तीव्र ताप आणि थरथर
*श्वसनास त्रास, नाकातून स्राव
*गळ्याची आणि जबड्याची सूज
*जनावरांचा अचानक मृत्यू
-----------------------
२) फऱ्या (ब्लॅक क्वार्टर)
(क्लॉस्ट्रिडियम चौवोई जिवाणू)
*स्नायूंमध्ये सूज आणि वायू तयार होणे
*तीव्र ताप आणि लंगडेपणा
*प्रभावित भाग काळपट होणे
*जनावरांचा जलद मृत्यू
प्रतिबंधात्मक उपाय....
*लसीकरण: सर्व जनावरांना वेळेवर घटसर्प आणि फऱ्या लस द्यावी. लसीकरणासाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
*स्वच्छता: गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी, ओलसरपणा टाळावा आणि पाण्याचा निचरा योग्य रीतीने करावा.
*निरीक्षण: जनावरांमध्ये ताप, सूज किंवा असामान्य वर्तन दिसल्यास तातडीने पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
*पौष्टिक आहार: जनावरांना संतुलित आहार देऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी.
*पृथक्करण: आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे, जेणेकरून संसर्ग पसरू नये.
पावसाळ्यापूर्वी लसीकरण पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घटसर्प आणि फऱ्या हे आजार जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील पशुवैद्यकीय केंद्रांशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पुणे
-------------------------
तालुकानिहाय झालेले लसीकरण (२० जूनपर्यंत)
तालुका........घटसर्प.......फऱ्या
जुन्नर.........१८,३७७......३२२६
आंबेगाव.......८६६५........१६००
खेड..........१९,५००......३१५०
मावळ.........११,६००......१३३०
मुळशी..........६९३७.......११३७
वेल्हा...........४४१९........७५३
भोर............९०१३.......१४४१
पुरंदर...........११२५०.......१९२०
हवेली..........१४४२०........२४३५
शिरूर..........२५५७७........४४५८
दौंड...........१४१५५........२२९९
बारामती........१८७०७.........३३३१
इंदापूर.........३६०६७.........५८००
पुणे शहर........४२५०...........०
25076
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.