पुणे

चार लाख ९५ हजार फार्मर कार्ड तयार

CD

काटेवाडी, ता. ५ : जिल्ह्यातील एकूण १० लाख ३९ हजार १०१ नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी सहा लाख शेतकरी प्रत्यक्ष शेती करत असल्याचे ॲग्रीस्टॅक योजनेच्या अहवालातून समोर आले आहे. यापैकी चार लाख ९५ हजार ५४१ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार झाले आहेत, तर उर्वरित शेतकऱ्यांना हा आयडी देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन कुळ कायदा उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली.

केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करून फार्मर आयडी तयार करण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी अनिवार्य आहे. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड, शेती विकासासाठी कर्ज, तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नुकसान भरपाई यांचा समावेश आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणीशिवाय शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. ही योजना १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविली जात असून, शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांकाद्वारे पारदर्शक आणि जलद सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनाने नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी गावोगावी शिबिरांचे आयोजन केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावरील शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करून फार्मर आयडी मिळवता येणार आहे. हा आयडी शासकीय योजनांसह पिकांबाबत सल्ला, हवामान माहिती, बाजारभाव, कीटकनाशकांचा वापर, मृदा आरोग्य यांसारख्या सुविधांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीचे फायदे
* केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा तत्काळ लाभ.
* पिकांसाठी किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज सुविधा.
* हवामान, बाजारभाव, कीड-रोग आणि मृदा आरोग्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला.
* आपत्ती व्यवस्थापन आणि पीक विम्यासाठी जलद सर्वेक्षण.

तालुका...एकूण शेतकरी....तयार कार्ड
बारामती...१२६०८९.......५३७४०
दौंड......१०२८४२.......५२२४८
शिरूर.....११४३५९.......५६५२८
खेड.......९९२५५.......४६२३०
इंदापूर.....१०९०६६.......४७७८२
जुन्नर......८७८२६.......६४३७६
पुरंदर......८६५११.......४०३८१
हवेली......५९४१६.......१९०३९
मुळशी......५९६९४.......१८५७१
मावळ......५१२०१.......२२२७१
भोर........५४८१४.......२५१५१
वेल्हा........२०६७७.......९१२६
आंबेगाव......६७३५१.......४००६७
एकूण.......१०३९१०१......४९५५४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT