काटेवाडी, ता. १६: जिल्ह्याला २०२५-२६ साठी हॉर्टिनेट प्रणालीअंतर्गत द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी, कांदा आणि भाजीपाला पिकांसाठी २२,४२० हेक्टर क्षेत्र नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २,२७६.९२ हेक्टर क्षेत्राची आणि ३,९३२ प्लॉट्सची नोंदणी पूर्ण झाली आहे. इंदापूर तालुका, फळबागांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो, येथे द्राक्षासाठी १,००० हेक्टर, डाळिंबासाठी १,२०० हेक्टर आणि केळीसाठी १,४०० हेक्टरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली.
युरोपीय युनियनसह विकसित देशांना निर्यात करण्यासाठी कीडनाशक उर्वरित अंशमुक्त आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनाची हमी देण्यासाठी हॉर्टिनेट प्रणाली प्रभावीपणे कार्यरत आहे. सध्या डाळिंब, केळी, कांदा आणि भाजीपाला पिकांची नोंदणी सुरू असून, पुढील महिन्यापासून द्राक्षाची नोंदणी सुरू होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली. हॉर्टिनेट प्रणाली २००३-०४ मध्ये द्राक्षांसाठी ग्रेपनेटद्वारे सुरू झाली. याच धर्तीवर आंब्यासाठी मँगोनेट, डाळिंबासाठी अनारनेट, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट आणि संत्र्यासाठी सिट्रसनेट अशा प्रणाली विकसित करण्यात आल्या. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बागांची नोंदणी, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर आणि उत्पादनाची मागणी शक्य होते. राज्याला सन २०२५-२६ साठी १.२५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात कृषी आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर स्वतंत्र निर्यात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
निर्यातक्षम उत्पादनासाठी उपाययोजना......
हॉर्टिनेट प्रणाली: ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, व्हेजनेट आणि सिट्रसनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी आणि कीडनाशक उर्वरित अंशमुक्त उत्पादनाची हमी.
कीटक व्यवस्थापन: फळमाशी नियंत्रणासाठी प्रतिहेक्टरी किमान ४ फेरोमोन सापळे (मिथाईल युजेनोल किंवा क्युलूर) लावण्याचा सल्ला.
प्रशिक्षण: शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना निर्यातक्षम पिकांबाबत प्रादेशिक प्रशिक्षण संस्थांमार्फत मार्गदर्शन.
अशी शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया
आवश्यक कागदपत्रे: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी प्रपत्र १, ७/१२ उतारा, आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावे.
प्रमाणपत्र: नोंदणी पूर्ण झाल्यावर हॉर्टिनेट प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल.
आर्थिक सहाय्य आणि पाठबळ
योजना: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामार्फत आर्थिक सहाय्य.
निर्यात कक्ष: कृषी आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर निर्यात मार्गदर्शन कक्ष स्थापन.
हॉर्टिनेट अंतर्गत २०२५-२६ मध्ये पुणे जिल्ह्यात
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा अहवाल ( हेक्टर मध्ये )...
प्रकार........ लक्षांक....... साध्य.......... प्लॉट
डाळिंब......३०००..........७५६.५८........१३२६
भाजीपाला......५०००.......६६८.२२........११६६
कांदा.........५०००........७५६.७०.......१३२५
केळी.........३०५०........९५.४२.........११५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.