काटेवाडी, ता. १८ : पुणे शहरात शेतीच्या क्षेत्रात एक नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी झाला आहे. पुण्याच्या शैलेश मोडत यांनी कंटेनरमध्ये कोर्डिसेप्स मशरूमची शेती करून सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या मशरूमला सुमारे एक लाख रुपये प्रतिकिलो बाजारभाव आहे. विशेष म्हणजे, हा मशरूम ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पुण्यातील या अनोख्या शेतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
पुणे आता केवळ केशरच नाही, तर कोर्डिसेप्स मशरूमच्या शेतीतही पुढे आहे. ३६५डी फार्म्स फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या शैलेश मोडक यांनी पुण्यात कंटेनरमध्ये ही शेती सुरू केली आहे. यापूर्वी त्यांनी कंटेनरमध्ये इतर मशरूमची शेती केली होती कोर्डिसेप्स मशरूमची शेती हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. या शेतीमुळे पुण्यातील शेतकऱ्यांना आणि नवउद्योजकांना एक नवी दिशा मिळाली आहे. कमी जागेत आणि कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न मिळवता येते. या शेतीमुळे पुणे शेतीच्या नकाशावर आणखी एकदा ठळकपणे झळकले आहे.
कोर्डिसेप्स मशरूम म्हणजे काय?
कोर्डिसेप्स मिलिटॅरिस हे एक औषधी मशरूम आहे, जे नैसर्गिकरित्या हिमालय, चीन, भूतान आणि नेपाळमध्ये आढळते. आता हे मशरूम इनडोअर वातावरणात आणि प्रयोगशाळेतही यशस्वीपणे वाढवले जात आहे. यात कोर्डिसेपिन, अॅडेनोसिन, बीटा-ग्लूकन्स आणि पॉलिसॅकराइड्ससारखे औषधी घटक असतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
आरोग्यासाठी फायदे
ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवणे : हे मशरूम खेळाडू आणि जिम करणाऱ्यांसाठी ऊर्जा वाढवणारे टॉनिक म्हणून वापरले जाते.
रोगप्रतिकारक शक्ती : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
श्वसन आणि हृदयाचे आरोग्य : फुफ्फुस आणि हृदयाच्या विकारांवर उपयुक्त.
कर्करोग विरोधी गुणधर्म : कर्करोगाशी लढण्यास मदत करते.
मानसिक स्वास्थ्य : एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
मधुमेह नियंत्रण : रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
पुण्यातील शेतीची पद्धत....
मशरूम शेतीसाठी १८ ते २२ अंश सेल्सिअस तापमान आणि ६० ते ७० टक्के आद्रता आवश्यक आहे. ही शेती कंटेनरमध्येच नाही, तर घरातील छोट्या खोलीत किंवा कोणत्याही इनडोअर जागेतही करता येते. याचा वाढीचा कालावधी सुमारे ६० ते ७० दिवसांचा आहे.
कसे वापरले जाते?
कोर्डिसेप्स मशरूमचा उपयोग पावडर, कॅप्सूल, टॉनिक किंवा अर्काच्या स्वरूपात केला जातो. याशिवाय साबण, फेसवॉश आणि त्वचेसाठीच्या उत्पादनांमध्येही याचा वापर होतो. चीन आणि जपानमध्ये याला “चायनीज हर्ब” म्हणून ओळखले जाते, तर भारतात याची मागणी वाढत आहे.
व्यवसायाची संधी
मशरूमची किंमत ७०,००० ते १,००,००० रुपये प्रतिकिलो (सुक्या मशरूमसाठी) आहे. औषधी कंपन्या, सप्लिमेंट ब्रँड्स, ऑनलाइन मार्केटप्लेस (अमेझॉन, फ्लिपकार्ट, १एमजी) आणि स्थानिक आयुर्वेदिक दुकानांमध्ये याची विक्री होते. याशिवाय अमेरिका, कोरिया आणि जपानमध्ये निर्यातीची संधी आहे. यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही उपलब्ध आहेत, ज्याची किंमत १०,००० ते २५,००० रुपये आहे.
01131, 01132, 01133
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.