पुणे

बारामती बाजारात मुगाला उच्चांकी भाव

CD

काटेवाडी, ता. २३ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव बाजारात गुरुवारी (ता.२१) मुगाला उच्चांकी १२,५५० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. कमाल बाजारभाव १,१५० रुपयांनी कमी झाले. तरीही मुगाला सातत्याने चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
मका, ज्वारी आणि बाजरीच्या दरांमध्येही स्थिरता दिसून आली. गहू-लोकवनची सर्वाधिक ४३३ क्विंटल आवक नोंदवली गेली. बाजारात एकूण १,७०९ क्विंटल धान्याची आवक झाली. यामध्ये गहू-लोकवन (४३३ क्विंटल), गहू-२१८९ (२८८ क्विंटल), बाजरी-हायब्रीड (२०६ क्विंटल), ज्वारी-हायब्रिड (१८१ क्विंटल), बाजरी-महिको (१३८ क्विंटल), ज्वारी-गावरान (१२० क्विंटल) आणि मका-तांबडी (६५ क्विंटल) यांचा समावेश होता. मका-तांबडीला २,२७५ ते २,७०१ रुपये, ज्वारी-गावरानला २,६०० ते ३,५५१ रुपये, ज्वारी-हायब्रिडला १,९०० ते २,८५१ रुपये, बाजरी-महिकोल २,५५१ ते ३,१०० रुपये आणि बाजरी-हायब्रीडला २,००० ते २,८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. बाजारातील स्थिर दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT