काटेवाडी, ता. २७ : बारामती बाजार समितीमार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये शासकीय हमीभावाने तूर (तुरी) खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी २० जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून, २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
केंद्र सरकारने यंदा तुरीचा हमी दर ८,००० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. या दराने वाळलेली आणि स्वच्छ तूर खरेदी केली जाणार आहे. बारामती तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विनायक गावडे आणि उपसभापती अरुण सकट यांनी केले आहे. नोंदणी बारामती येथील बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघ कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने करावी लागेल. फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच हमीभावाने तूर खरेदी होणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर खरेदी सुरू झाल्यावर एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना कळविले जाईल. त्यावेळी तूर खरेदी केंद्रावर आणून विक्री करता येईल. तुरीचा दर्जा तपासूनच खरेदी केली जाईल, अशी माहिती नीरा कॅनॉल संघाचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली आहे. दिलेल्या मुदतीतच नोंदणी करणे गरजेचे आहे, अन्यथा हमीभावाचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
* जमिनीचा ७/१२ उतारा (त्यावर सन २०२५-२६ च्या पिकपेरा उताऱ्यात तुरीची नोंद असणे गरजेचे)
* आधार कार्ड
* बँक पासबुकची झेरॉक्स (IFSC कोडसह)
* मोबाईल नंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.