drought  sakal
पुणे

Drought News : दौंड तालुक्याला दुष्काळाच्या झळा

कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटणार एकट्या दौंड तालुक्यामध्ये दरवर्षी ५० लाख टन उसाचे उत्पादन होते.

सकाळ वृत्तसेवा

खुटबाव, ता.१८ : पावसाने दांडी मारल्याने दौंड तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पाण्याअभावी जिरायतीसह बागायती भागातील पिकांना मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या मुळा मुठा व भीमा नदीला यावर्षी एकदाही पूर न आल्याने तालुक्यातील शेतकरी लांबलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

लांबलेल्या पावसाने मुळा मुठा व भीमा नदीचे पाणी पातळी कमी झाल्याने शेतकरी आपल्या विद्युत पंपापासून शेतीला पाणी पुरावे म्हणून पाइप नदीपात्रामध्ये लांबवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी नदीला पूर येत असल्यामुळे दोन-तीन महिने नदीपट्ट्यातील विद्युत पंप हे पाइपपासून वेगळे करून सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात. पावसाच्या पाण्यामुळे शेतीला पाण्याची गरज पडत नाही.

मात्र यावर्षी शेतकऱ्यांना विद्युत पंप काढण्याची वेळ आलीच नाही. याउलट ऐन पावसाळ्यामध्ये दिवसभर ऊन पडत असल्याने तीव्र उन्हाळ्याचा झळा जाणवत आहेत. भरीस भर म्हणून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतातील पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. दौंड तालुक्यात या वर्षी १४,८२० हेक्टर उसाची लागवड झाल्याचे दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.

कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटणार एकट्या दौंड तालुक्यामध्ये दरवर्षी ५० लाख टन उसाचे उत्पादन होते. यावर्षी कमी पावसामुळे उत्पादन घटणार आहे. परंतु पाऊस न झाल्याने आतापासूनच या उभ्या ऊस पिकाला जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे. दरवर्षी दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे ऐन पावसाळ्यात बंद असतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर ही गुऱ्हाळे सुरू होतात. यावर्षी पाऊसच नसल्याने खंड न पडता गुऱ्हाळे चालू आहेत.

तालुक्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच पावसाने पाठ फिरवली आहे. गेली दोन महिने पाऊस आला नसला तरी आगामी गणेशोत्सवामध्ये आम्हा शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे. ''देर से आये पर दुरुस्त आए'' या उक्तीप्रमाणे पाऊस येईल व शेतकऱ्यांचे समाधान करेल, अशी अपेक्षा आहे.
- संतोष थोरात, प्रगतशील शेतकरी, खुटबाव

गो शाळेत गाई दाखल करण्याची वेळ
पाऊस लांबल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या गाई सांभाळण्यासाठी चौफुला (ता.दौंड) येथील बोरमलनाथ गो शाळेला दिल्याची माहिती गो शाळेचे प्रमुख कैलास शेलार यांनी दिली. यापूर्वी भटक्या गायी गो शाळेत दाखल केल्या जायच्या. या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाई गो शाळेत दाखल होत असल्याने दुष्काळाचे विदारक चित्र ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT