पुणे

भांडगाव येथील नवसाला पावणारा रोकडोबानाथ

CD

भांडगाव (ता. दौंड) येथील रोकडोबानाथ देव हा भाविकांच्या नवसाला पावणारा देव म्हणून या देवाकडे पाहिले जाते. यवत गावातील दोरगे आडनावाच्या काही ग्रामस्थांनी गावापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला व गावाच्या असणाऱ्या पश्चिम दिशेला भांडगाव गाव वसविण्यात आले.
पुणे-सोलापूर महामार्गापासून शून्य किलोमीटर असणारे भांडगाव हे तालुक्यातील आदर्श गाव म्हणून या गावाकडे पाहिले जाते. ग्रामदैवत रोकडोबानाथ या देवाच्या मंदिराची १९९१ मध्ये बांधकाम करण्यात आले.


पश्चिममुखी असणारे रोकडोबानाथ मंदिर हे नाथांचा अवतार असून जागृत देवस्थान आहे. मंदिराला एकच मोठा कळस आहे. गावातील महत्त्वपूर्ण बैठका या मंदिरामध्ये होतात. रोकडोबानाथ देवाचा गाभारा व भाविकांना बसण्यासाठी सभागृह आहे. आजही दररोज सकाळी पूजाअर्चा करण्याचा मान पुजारी गणेश दीक्षित यांना आहे. लोकवर्गणीतून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधण्यात आले. एका खासगी कंपनीच्या सीएसआर फंडातून गावामध्ये दीड कोटी रुपये खर्चून महादेव मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. दरवर्षी होळी पौर्णिमेनंतर येणाऱ्या दशमीला ग्रामदैवत रोकडोबानाथाची यात्रा भरते. यावेळी अनेक जिल्ह्यातील व परत जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येतात. आपला नवस फेडतात.

पिठले भाकरीचे जेवण
दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे-सोलापूर रस्त्यावरून अर्धा किलोमीटर अंतर पार करत रोकडोबानाथ देवाच्या भेटीसाठी येते. हा क्षण भाविक डोळ्यांमध्ये साठवतात. यावेळी सर्व भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने पिठले भाकरीचे जेवण दिले जाते. यावर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावर ग्रामस्थांच्या योगदानातून १० लाख रुपये खर्चून रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीतील सिंहासनावर बसलेल्या प्रतिकृतीची हुबेहूब मूर्ती साकारण्यात आली आहे.

खासगी कंपन्यांमुळे विकासकामे
गावामध्ये असणाऱ्या शाळा, अंगणवाडी इमारती, अद्ययावत जिम, पाळणाघर, प्राथमिक आरोग्य केंद्र, व्यायाम शाळा, अंतर्गत रस्ते, अंतर्गत गटारे सुसज्ज असून तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून भांडगावकडे पाहिले जाते. गावाच्या सभोवताली असणाऱ्या खासगी कंपन्यांमुळे गावच्या विकास कामांमध्ये मदत होत आहे. या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून वेगवेगळी विकास कामे होत आहेत.

भांडगावचा डंका जिल्हाभर
जिल्हा परिषद भांडगाव शाळेला नुकताच पीएम श्री पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारी भांडगाव शाळा ही तालुक्यातील पहिली व एकमेव शाळा ठरली आहे. राजकारणापुरते राजकारण इतर वेळेस समाजकारण या विचारामुळे भांडगावच्या विकासाचा डंका जिल्हाभर पोहोचला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चालू पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कुल थोरात गटाने एकत्रित बसून ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. भविष्यामध्ये अनेक आदर्श योजना भांडगावमध्ये आणण्याचा मानस येथील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT