पुणे

राजुरी पाटी येथील तलाव ३ वर्षांनी तुडुंब

CD

खुटबाव, ता. ६ : खोर (ता. दौंड) हे सर्वाधिक दुष्काळी गाव समजले जाते. आमदार राहुल कुल व शशांक फाउंडेशन यांच्या माध्यमातून खोर परिसरातील राजुरी पाटी येथील ५ एकर क्षेत्रामध्ये विस्तीर्ण असणाऱ्या तलावात ३ वर्षांनी जनाई शिरसाईच्या आवर्तनाद्वारे पाणी आले. या निर्णयामुळे १०० एकर शेती व परिसरातील वाडी वस्तीसाठी आगामी तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

राजुरी पाटी येथे २००३-०४ मध्ये खोरचे माजी उपसरपंच पोपटराव चौधरी यांचा संकल्पनेतून तत्कालीन आमदार रंजना कुल यांनी सुमारे ५ एकर क्षेत्रामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी तलाव निर्माण केला. यासाठी गुलाबराव चौधरी, साहेबराव चौधरी, बबन चौधरी, नारायण चौधरी, भगवान चौधरी व कांतिलाल चौधरी या भावंडांनी विनामोबदला जमीन हस्तांतरित केली. सदर तलाव बांधल्यामुळे १०० एकर जमीन पाण्याखाली आली. मागील ३ वर्ष नियोजन नसल्याने हा तलाव कोरडा होता. शेती, वन्यजीव तसेच ग्रामस्थांना पिण्याचे पाणी याची अडचण येत होती. आमदार राहुल कुल यांचा प्रयत्नांतून ५ वर्षांपूर्वी खोरसाठी जनाई शिरसाई योजनेची वार्षिक ३ आवर्तने मिळू लागली, परंतु संबंधित राजुरी पाटी येथील तलाव ओढ्यापासून लांब असल्याने जनाई शिरसाई योजनेचे पाणी पोहचत नव्हते.

शशांक फाउंडेशनतर्फे ११०० फूट जलवाहिनी
शशांक फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष चौधरी व संस्थापक विकास चौधरी यांनी या तलावाला जोडणारी ११०० फूट लांबीची बंदिस्त जलवाहिनी शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर ८ दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून खोरला जनाई शिरसाईचे आवर्तन मिळाले. या आवर्तनातूनच बंद जलवाहिनीद्वारे राजुरी पाटी येथील तलाव ३ वर्षानंतर प्रथमच भरण्यात आला.

तीन वर्षांनी तलावामध्ये पाणी येणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. शशांक फाउंडेशनला या कामी दौंडचे आमदार राहुल कुल यांचे सहकार्य मिळत आहेत. आजतागायत फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, शैक्षणिक साहित्य मदत, विद्यार्थी दत्तक योजना, ड्रायव्हिंग लायसन्स शिबिर आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत.
- विकास चौधरी, संस्थापक शशांक फाउंडेशन


01980

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ट्रॅव्हल्समधील १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

SCROLL FOR NEXT