खुटबाव, ता. २ : महाराष्ट्र ८,९४७ सायबर गुन्ह्यांची २०२४ मध्ये नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात सर्वाधिक ६ हजार ७०७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. मुंबईत ४ हजार ८४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा अधिवेशनात केली.
अधिवेशनात बोलताना कुल म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर वाढले आहे. नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बनावट पोलिस किंवा एटीएस अधिकारी बनून नागरिकांना फोन करून हेरगिरीच्या आरोपाखाली खंडणी मागण्याचे, तसेच एआयचा वापर करून नागरिकांना घाबरवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे महिलांवर, लहान मुलांवर आणि ज्येष्ठांना विशेष धोका निर्माण झाला आहे. राज्यात सायबर गुन्ह्यांची उकल २५ टक्के असून, प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला सायबर गुन्ह्यांविषयी प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी सायबर सेल, सायबर पोलिस ठाण्याची स्थापना करणे गरजेचे आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या सायबर गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांनीच करावा आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करावी.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने नुकतीच ८३८ कोटी रुपयांची गुंतवणूक करून सायबर सुरक्षेसाठी व्यापक पावले उचलली आहेत. या धोरणाचे कौतुक करत सायबर गुन्हेगारीवर वचक बसावा, अशी मागणी कुल यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.