पुणे

वारीत चुकलेले आजोबा एक महिन्यानी घरी परतले

CD

खुटबाव, ता. २६ : पिंपळगाव (ता. दौंड) येथील ७० वर्षीय ज्येष्ठ वारकरी बाळासाहेब भगत पंढरपूरच्या वारीमध्ये हरवले होते. भगत परिवाराने वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावामध्ये त्यांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. शुक्रवारी (ता. २५) थेऊर (ता. हवेली) येथे पिंपळगावचे भाचे अरविंद गायकवाड यांनी भगत यांना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता भगत परिवाराशी संपर्क केला. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर भगत कुटुंबामध्ये मिसळले. गायकवाड यांच्या रूपामध्ये आम्हाला पंढरीचा पांडुरंग भेटला अशी भावना यावेळी भगत परिवाराने व्यक्त केली.
पिंपळगाव येथे शेतमजुरी करणारे बाळासाहेब भगत हे संगम येथील संतराज महाराज पालखी सोहळ्यामध्ये २२ जून रोजी सहभागी झाले. वयानुरूप विस्मृती होत असल्याने कुटुंबीयांचा विरोध पत्करून ते पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. वाटेमध्ये असताना ते सोहळ्यातून हरवले. संबंधित बाब भगत यांचे चिरंजीव सचिन यांना कळवण्यात आली. सचिन यांनी मित्रपरिवारासह आषाढ वारीतील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी सोहळा जाणाऱ्या ठिकाणी आपल्या वडिलांना शोधले. बाळासाहेब भगत यांच्याकडे मोबाईल, आधार कार्ड, ओळखपत्र नसल्याने संपर्क होण्यास अडचणी येत होत्या. तरीही गणेश भगत यांचे शोध कार्य सुरूच होते. अशातच शुक्रवारी (ता. २५) दुपारी २.०० वाजता गायकवाड (रा. नायगाव, ता. हवेली) हे ट्रकमधून थेऊरकडे चालले होते. ट्रक चालवताना त्यांचे रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या भगत त्यांच्याकडे लक्ष गेले. गायकवाड यांना भगत हरविल्याची माहिती होती. त्यांनी पिंपळगाव येथील मामा तुकाराम गोंडवाल यांना फोन करून भगत सापडल्याची माहिती दिली. वडीलांना पाहताच गणेश यांना आनंदाश्रू आले. अरविंद गायकवाड यांनी भगत यांना मुलाच्या ताब्यात दिले. त्यानंतर गणेश याने अरविंद गायकवाड यांचा सत्कार केला.


अरविंद गायकवाड

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT