खुटबाव, ता. ७ : खामगाव (ता. दौंड) येथे संतोष नागवडे या उच्चशिक्षित युवकाने आपल्या वडिलांच्या दशक्रिया विधीनिमित्त पारंपरिक प्रवचन सेवेला फाटा दिला. स्वर्गीय रामचंद्र नागवडे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त हृदयरोग तज्ञ राहुल सावंत यांनी हृदयरोग- कारणे व उपाय या विषयावर विनामूल्य व्याख्यान देत खामगाव परिसरामध्ये स्तुत्य व अनुकरणीय पायंडा पाडला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नितीन दोरगे, सरपंच योगेश मदने, भीमा पाटसचे संचालक प्रकाश शेळके, खरेदी विक्री संघाचे संचालक विजय नागवडे, जगन्नाथ नागवडे, माणिकराव नागवडे, उद्योजक सुखदेव चोरमले, कैलास खेडेकर, उद्योजक नीलेश यादव, विठ्ठल बर्वे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राहुल सावंत म्हणाले की, ‘‘अयोग्य आहार, अनावश्यक सवयी, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, वाढते वय, ताणतणाव, धूम्रपान यामुळे हृदयरोग होतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार, आदर्श जीवनशैली यामुळे हृदय रोगावरती नियंत्रण आणता येऊ शकते. पुणे येथे हृदयमित्र फाउंडेशनच्या वतीने मी वर्षभर आरोग्याचे काम करत असतो. भविष्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करण्याचा विचार आहे.’’
काळानुसार बदल होणे अपेक्षित आहे. वडिलांच्या दशक्रिया विधीला प्रवचनाऐवजी व्याख्यान ठेवावे असा विचार मित्रांनी माझ्यासमोर मांडला. व्याख्यानातून प्रबोधन होईल या भावनेतून मी या नवीन प्रयोगाला तत्काळ होकार दिला. व्याख्यान झाल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
- संतोष नागवडे, संयोजक
02984
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.