खुटबाव, ता. ७ ः खामगाव (ता. दौंड) येथील सोनाली सागर कुल यांची दौंड तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी निवड झाली. कुल यांना या निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा पायल देवकर यांनी दिले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, माजी संचालक सुरेश घुले, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, तुषार थोरात, अनिल नागवडे आदी उपस्थित होते. कुल या दौंड तालुका राष्ट्रवादी युवती सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अध्यक्षपदी बढती देण्यात आल्याचे राष्ट्रवादी प्रवक्त्या नागवडे यांनी सांगितले.
02986