पुणे

खोरमधील अंजिराची मुंबई, दिल्लीस गोडी

CD

खुटबाव, ता.२९ : खोर (ता. दौंड) येथे ५३० एकर क्षेत्रामध्ये अंजिराचा खट्टा बहार सुरू झाला आहे. दुष्काळी गाव ते अंजिराचे गाव असा बदल स्वीकारत या गावाला अंजिराचे गाव म्हणून राज्यभर ओळख मिळाली आहे. हंगामातील गुलाबी लालसर रंगाचे, ताजे, व अविट गोडीचे अंजीर बाजारपेठेत दाखल झाले आहे. या अंजीर विक्रीमुळे खोर गावाचे अर्थकारण बदलले आहे. पुणे जिल्हा, लातूर, उदगीर, मुंबई व दिल्लीतील मॉलपर्यंत खोरच्या अंजिरांना मागणी वाढली आहे.

खोर हे दौंड तालुक्यातील एकमेव अंजिराचे गाव आहे. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत खट्टा बहार असतो. खोर परिसरातील डोंबेवाडी येथे अंजिराच्या बागा लगडल्या आहेत. चारही बाजूंनी डोंगर, मध्यभागी सपाट जमीन असल्याने या ठिकाणी अंजिरासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या हंगामात गेल्या कित्येक वर्षाचे विक्रम पावसाने मोडले. यावर्षी दौंड तालुक्यात सरासरी ४०० मिलिमीटर पाऊस झाला. परंतु डोंगराळ भाग असल्याने पडलेला पावसाचा या परिसरासाठी अनुकूल परिणाम झाला. सध्या बाजारपेठेत प्रतिकिलो ६० रुपये दराने अंजीर विक्री होत आहे. सध्या दररोज ४००० किलो अंजीर उत्पादन होत आहे. विशेष म्हणजे येथील अंजीर केमिकल विरहित असावे, यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह असतो.
अंजीर विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ शोधण्याची गरज भासत नाही. दुर्मीळ फळ असलेले अनेक मोठमोठे व्यापारी अंजिराच्या शोधात खोर मध्ये दाखल झाले आहेत. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच माल खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

अभियंत्या शेतकऱ्याने बनवला अंजिराचा ब्रँड
चांगला पगार असणाऱ्या अभियंत्याची नोकरी सोडून गावातील युवक समीर डोंबे यांनी अंजीर शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तयार झालेले अंजिरासाठी बाजारपेठ शोधली. पवित्रिक कंपनीच्या माध्यमातून अंजिरापासून जॅम, जेली अशा विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांना बेंगळुरू, दिल्ली, मुंबई यांसारख्या महानगरांतील विशिष्ट पॅकेजिंग मधील अंजीराला मॉलमध्ये मोठी मागणी आहे. आज डोंबे यांनी परिसरातील अनेक ग्रामस्थांना रोजगार दिला आहे.


यंदा पाऊस चांगला झाला आहे. चांगल्या पावसाचा सकारात्मक परिणाम अंजीर बागेवर झाला आहे. सध्या थंडीचा हंगाम सुरू असला तरी येथील शेतकरी दिवसभर अंजिराच्या बागेतच असतो. अंजीर उत्पादन कष्टमय असले तरी, गेले अनेक वर्षापासून शाश्वत उत्पादन मिळत असल्याने आमच्या परिसराचा हा मुख्य व्यवसाय बनला आहे.
- जालिंदर डोंबे, अंजीर उत्पादक शेतकरी, खोर

03116

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

आजचे राशिभविष्य - 10 मार्च 2026

अग्रलेख : ‘सूर्या’ची पिल्ले!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मार्च 2026

नीज येईना...

SCROLL FOR NEXT