पुणे

गलांडवाडी शाळेचा आदर्श प्रवास

CD

प्रकाश शेलार ः सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. १ : दौंड तालुक्यामध्ये पहिलीपासून नववीपर्यंत शिक्षण देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गलांडवाडी ही एकमेव शाळा ठरली आहे. लोकसहभागातून शाळेचा चेहरा- मोहरा बदलला आहे. या शाळेमध्ये एकूण ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेने काळाची गरज ओळखत विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम अध्यापनासाठी ‘एआय’ हा विषय सुरू केला आहे. शाळेची दुमजली इमारत असून, सात शिक्षक आहेत. वर्ष १९२६मध्ये स्थापना झालेल्या या शाळेचा चालू वर्षी शताब्दी महोत्सव आहे.
या शाळेमध्ये एकूण १० वर्ग खोल्यांमध्ये वर्ग भरत आहेत. तुकाराम शेलार हे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असून, भारत विभूते, अश्विनी पवार, सुवर्णा खळदकर, रेखा विचारे, सीमा साबळे, गणेश शिंदे हे शिक्षक अध्यापन करत आहेत. याशिवाय सध्या आठवी, नववी, दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी दरमहा ४० हजार रुपये लोकवर्गणी देत ग्रामस्थ सहकार्य करत आहेत.

शाळेतील उपक्रम
सायकल बॅंक, स्पोर्ट्स क्लब, सुंदर हस्ताक्षर वर्ग, गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका, टेरेसवर उभारलेली आधुनिक परसबाग, एमएससीआयटी वर्ग, किल्ले स्पर्धा, किशोरी मेळावा, प्रश्नमंजूषा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, स्वच्छता दूत उपक्रम, रांगोळी, मानवी मनोरे, योगासने.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
स्वर्गीय गंगूबाई बापूसाहेब शितोळे यांनी आपले वडील स्वर्गीय सुभेदार अहिलोनी कदम यांच्या स्मरणार्थ २० गुंठे जागा वर्ष १९५६मध्ये शाळेला दान केली. सध्याची शाळेची इमारत या जागेमध्ये आहे. वर्ष २०२५मध्ये ग्रामस्थ निळकंठ शितोळे यांनी ३० लाख रुपये किमतीची अर्धा एकर जागा शाळेसाठी बक्षीस दिली. किशोर छाजेड यांनी शाळा विकासासाठी एक लाख रुपये निधी दिला. भीमा पाटस कारखान्याची माजी संचालक ज्ञानदेव कदम यांनी गेली पाच वर्ष पहिली ते नववी प्रथम येणारे विद्यार्थ्यांना १० हजार रुपये बक्षीस देण्याचा पायंडा जोपासला आहे. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रेय पवार, रमेश शेलार व रामचंद्र देवकर यांनी प्रत्येकी १० हजार रुपये देणगी दिली. वाढदिवसाचा खर्च टाळून दरवर्षी संदीप शितोळे व‌ विशाल थोरात यांच्या वतीने विद्यालयास पाच हजार रुपये देणगी दिली जाते.

स्कूल बसने विद्यार्थ्यांचा प्रवास
या शाळेची वर्ष २०१०मध्ये पहिली ते सातवीपर्यंतची पटसंख्या ८५ झाली होती. एकूणच शाळा बंद पडते की काय अशी अवस्था होती. यानंतर ग्रामसभा झाली, पालकांनी पुढाकार घेतला, आसपासच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील आपल्या स्वतःच्या पाल्यांना सर्वप्रथम या शाळेत प्रवेश दिला. लोकसहभाग वाढवला. दहावीपर्यंत शिक्षणाची मान्यता मिळवली. आज शाळेमध्ये ३७५ विद्यार्थी शिकत आहेत. विशेष म्हणजे खुटबाव येथून दोन व केडगाव येथून दोन स्कूल बसमध्ये विद्यार्थी प्रवास करत आवर्जून या शाळेमध्ये अध्यापनासाठी येत आहेत.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता
शाळेतील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आयुष शेलार याने गुणवत्तेच्या जोरावर अमेरिकेतील नासा संस्थेला भेट दिली. कौस्तुभ तावरे याची इस्रो संस्थेला भेट. तपश्या थोरात या विद्यार्थिनीची आयशर संशोधन केंद्राला भेट. शिष्यवृत्ती निकालाची चांगली परंपरा या शाळेने जोपासली आहे. चालू वर्षी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत २६ विद्यार्थी पात्र, त्यापैकी चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. इयत्ता आठवीचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे. यापूर्वी शाळेतून १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. एनएमएमएस या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत निरंजन चव्हाण या विद्यार्थ्याचा दौंड तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे. नवोदय विद्यालयासाठी विद्यार्थ्यांची निवड. आय ॲम विनर स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

क्रीडा स्पर्धेत उस्फूर्त कामगिरी
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये सातत्याने लेझीम कबड्डी खो- खो व भजन या प्रकारामध्ये शिवाय वैयक्तिक स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तालुक्यातील कला क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेचा दबदबा कायम आहे.

शैक्षणिक व सामाजिक उपक्रम
कचरा मुक्त शाळा, अटल सायन्स लॅब, रोबोटिक्स लॅब, बोलक्या भिंती, सौर ऊर्जा, सोलर सिस्टिम, संगणक कक्ष, स्वतंत्र वाचनालय, स्मार्ट टीव्ही व डिजिटल शिक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, परसबागेतील भाजीपाल्याचा मध्यान्ह भोजनामध्ये उपयोग. शिक्षक प्रशिक्षणाची सुविधा, वाढदिवसाच्या औचित्य साधून विद्यार्थ्याकडून पुस्तक भेट.

भविष्यातील योजना
चार खोल्या नव्याने बांधणे, क्रीडा प्रकारासाठी क्रीडांगण आराखडा बांधणे, कौशल्यावर आधारित शिक्षण, सर्वांगीण विकासावर भर, रात्री अभ्यासिका सुरू करणे.

03199

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT