पुणे

खामगावकरांनी जपली ४०० वर्षांची परंपरा

CD

खुटबाव, ता. ८ ः खामगाव (ता. दौंड) येथे रंगपंचमीचे औचित्य साधून होणाऱ्या ग्रामदैवत खंबेश्वर यात्रेनिमित्त गावातील मुख्य चौकातील रंगाने काठोकाठ भरलेल्या एका मोठ्या हौदामध्ये गावातील सर्व आबालवृद्धांनी उड्या घेतल्या व संपूर्ण गाव निळ्या, गुलाबी रंगामध्ये न्हाऊन निघाले. तसेच, रंगपंचमी सणानिमित्त नवीन लग्न झालेल्या जावयांना व ग्रामस्थांना दगडी हौदामध्ये बुडवत गुलाबी रंगांमध्ये आंघोळ घालण्याची ४०० वर्षापासूनची आगळीवेगळी परंपरा गावाने जोपासली.
दगडी हौद खामगावच्या मुख्य चौकामध्ये बांधण्यात आला असून, या हौदाची लांबी १२ फूट, रुंदी १० फूट व खोली ६ फूट आहे. जमिनीला समांतर हौद होण्यासाठी जमिनीमध्ये खोल खड्डा घेऊन दगडांमध्ये हा हौद बांधण्यात आला आहे.
सकाळी देवाचा छबिना निघाला. गावापासून जवळच असणाऱ्या खंबेश्वर देवाच्या दर्शनासाठी ग्रामस्थ गेले. मंदिरामध्ये गुरव व ढेकणे परिवाराच्या वतीने देवाची पूजा झाली. छबिन्यामध्ये गावातील ढोल पथकाने आपली कला सादर केली. छबिना माघारी परतल्यावर हौदापाशी गावच्या जावयांच्या हस्ते हौदाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने जावयांचा संपूर्ण पोषाख देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी जावयांची उचलबांगडी करत त्यांना हौदामध्ये बुडवले. जावयांना हौदातून बाहेर काढल्यानंतर गावातील शेकडो युवक व स्थानिक ग्रामस्थांनी या हौदामध्ये उड्या मारल्या व स्वतःला रंगांमध्ये बुडवून घेतले. यावेळी संपूर्ण परिसराला निळ्या रंगाचे स्वरूप आले होते.
रंगपंचमी झाल्यानंतर हा हौद वर्षभर तात्पुरता बुजवण्यात येतो. यासंदर्भात खामगाव यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेश नागवडे म्हणाले की, ‘‘माझ्या जन्माच्या आधीपासून ही परंपरा आहे. ही परंपरा सुरू का झाली? याबाबत काहीच सांगता येणार नाही. परंतु वर्षानुवर्ष ही परंपरा असल्याचे आमचे पूर्वज म्हणायचे. विशेष म्हणजे हौदामध्ये टाकण्यात आलेला रंग कपडा फाटला तरी निघत नाही. त्यामुळे जावयासाठी सासुरवाडीची ही आठवण कायम स्मरणात राहते. या गावांमध्ये जावयाला किंवा पाहुण्यांना मान देण्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे. गावातील व्यक्तीला मान दिला की मतभेद रुसवे फुगवे होतात. म्हणून जावयाला मान दिला जातो. तसेच बैलपोळ्याच्या दिवशी सुद्धा पहिली बैलजोडी पुजण्याचा मान हा गावातील पाहुण्यांना दिला जातो. सलग ७ दिवस गावची यात्रा असल्याने रंगपंचमी सणाचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थ जमा होतात.’’

या जावयांना मिळाला मान
अक्षय जगताप, रोहन रणदिवे, प्रतीक गायकवाड, महेश नांदखिले यांनी हौदाची पूजा केली. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना संपूर्ण पोषाख देण्यात आला.

03385, 03386

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT