पुणे

पांढरेवाडी शाळेत भरला बाल आनंदी बाजार

CD

कुरकुंभ, ता. ३ : पांढरेवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष व्यवहाराचे धडे मिळावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंदी बाजाराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बाजारात तब्बल ३५ हजार रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमातून चिमुकल्यांनी भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची विक्री करत आपल्यातील व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखविली.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन पांढरेवाडीच्या सरपंच नीता कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुरकुंभ केंद्र प्रमुख आशा धाडगे, उपसरपंच वैशाली झगडे, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा जाधव, राजेंद्र भागवत, अमर गायकवाड, अनिल झगडे, पोलिस पाटील विलास येचकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास निंबाळकर, उपाध्यक्ष संदीप जगताप, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र कोंडे आदी उपस्थित होते.
या बाजारात विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील ताजा भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी मांडली होती. मात्र, या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे खाऊगल्ली. विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेली भेळ, मिसळ, वडापाव, इडली-सांबर, व्हेज मंचुरियन, गुलाबजाम, पावभाजी आणि उडीद वडे यांसारख्या रुचकर पदार्थांवर ग्रामस्थांनी यथेच्छ ताव मारला. बाजारात भाजीपाला आणि खाऊगल्ली मिळून एकूण ७० स्टॉल्स लावण्यात आले होते.
शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ बोंगाळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक मच्छिंद्र रामगुडे, महेंद्र भोसले, छाया साळवे, उज्ज्वला जगताप, ऊर्मिला गुजर आणि अविनाश अडसूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

Fake Lady Singham Arrested : पुण्यात तोतया 'लेडी सिंघम' समिना पठाणला अटक; पोलिसांच्या गणवेशात दाखवत होती रुबाब, पोलिसी खाक्या दाखवताच फुटलं बिंग!

Latest Marathi News Live Update : चित्रपट महामंडळासाठी ४९.९० टक्के मतदान; आज मतमोजणी, निकाल होणार जाहीर

Video : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

SCROLL FOR NEXT