लोणी देवकर, ता. २४ : कालठण नं. १ (ता. इंदापूर) येथे लहुजी सेनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दोन दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
शनिवारी (ता. २२) सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. रविवारी (ता. २३) सायंकाळी ६.३० वाजता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव तसेच ग्रामस्थांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक करमाळा बाळासाहेब पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब गलांडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय जगताप, नंदू जगताप, अविनाश जगताप, ग्रामपंचायत सदस्य संतोष जगताप आदींनी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.