पुणे

कदमवाकवस्तीत तरुणावर कोयत्याने हल्ला

CD

लोणी काळभोर, ता. २४ : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात विवाहसमारंभासाठी आलेल्या एका तरुणावर तिघांनी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. २०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सूर्यकांत पवार (वय २८, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनीच फिर्याद दिली आहे. सुरेश बाबूराव गायकवाड (वय १८), कुणाल राहुल चौगुले (वय १८) आणि शुभम धर्मा सोलंकी (तिघे रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, जखमी अवस्थेत त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT