पुणे

आंबेगावातील मुद्रांक विक्रेत्यांना इशारा

CD

मंचर, ता. २५ : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची (स्टॅम्प) विक्री ११० ते १३० रुपयाला राजरोसपणे केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर १२ मुद्रांक विक्रेत्यांना घोडेगाव येथील सहायक निबंधक (मुद्रांक) एस. एस. वळवी यांनी नोटीस बजावल्या आहेत. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्याचा इशारा नोटीसमध्ये दिला आहे. कारवाईचा बडगा उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये व पाचशे रुपये किमतीची मुद्रांक विक्री परवानाधारकांची संख्या बारा आहे. सरकारी सुटीव्यतिरिक्त दररोज एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मुद्रांकाची विक्री होत आहे. त्यामुळे प्रशासनाला चांगला महसूल मिळत आहे. मुद्रांक किमतीप्रमाणेच मुद्रांकांची विक्री नागरिकांना करावी, असा शासकीय नियम आहे. पण, गेली काही महिने काही मुद्रांक विक्रेते नागरिकांची अडवणूक करतात. जादा पैसे घेतात, अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंबेगाव तालुक्याचे सचिव दिनेश बाणखेले यांनी सहायक निबंधक वळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंचर शहरात मुद्रांक खरेदी करत असताना दोन परवानाधारकांकडे त्यांना आलेला अनुभव त्यांनी निवेदनात कथन केला आहे. अनेकदा मुद्रांक शिल्लक असूनही शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. शंभर रुपये किमतीचा मुद्रांक ११० ते १३० रुपये किमतीला विकला जातो. कोणत्याही परिस्थितीत आपले काम करून घ्यायचे, या उद्देशाने नागरिकही फारशी खळखळ करत नाहीत. त्याचा फायदा मुद्रांक परवानाधारक घेतात. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या व गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या मुद्रांक व्यावसायिकांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी दिनेश बाणखेले यांनी केली आहे.
दरम्यान, प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने दखल वळवी यांनी घेतली आहे. त्यांनी १२ मुद्रांक विक्रेत्यांना खुलासा मागणाऱ्या नोटीस पाठविल्या आहेत. ‘तुमचा मुद्रांक विक्री परवाना रद्द करण्याबाबत जिल्हा सहायक निबंधक(मुद्रांक) यांच्याकडे शिफारस का करण्यात येऊ नये?’ असे नोटिशीमध्ये नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT