पुणे

मंचरला कांद्याचा बाजारभाव कोसळला

CD

मंचर ता. १० : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. ९) ३५ हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजार भाव प्रतिकिलो दहा रुपयांनी घटले आहेत. गेल्या आठवड्यात प्रति किलोला २२ ते २७ रुपये बाजार भाव मिळाला होता. रविवारी १३ रुपये ते १७ रुपये प्रतिकिलो कांद्याला बाजारभाव मिळाला. बाजारभाव कमी झाल्याने व आर्थिक गणित बिघडल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त केला आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या समक्ष कांदा पिशव्यांचे वजन व लिलावपद्धतीने कांदा खरेदीचे व्यवहार केले जातात. त्यामुळे आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यांतील अनेक गावांतून कांद्याची आवक होते. तसेच नवीन कांदा काढणीची कामे सुरू आहेत. गेल्या आठवड्यात गुणवत्तेनुसार प्रति किलोला २२ ते २५ रुपये बाजारभाव मिळाला. त्यामुळे रविवारीही असाच बाजारभाव मिळेल, या अशाने शेतकऱ्यांनी निवड करून कांदा मंचर बाजार समितीत आणला होता. पण, बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत.

याबाबत आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नीलेश थोरात व कांदा खरेदीदार अडते सागर थोरात म्हणाले, ‘‘कांदा निर्यातीवर सध्या केंद्र सरकारने २० टक्के ड्यूटी लावली आहे. ही ड्यूटी रद्द केल्यास कांद्याचे बाजार भाव पूर्वपदावर येऊ शकतात. हा प्रश्न विधिमंडळात मांडून राज्य सरकारच्या मदतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याविषयी कांदा उत्पादकांनी माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे.’’

कांद्याचे प्रति दहा किलोचे बाजारभाव
सुपर लॉट एक नंबर गोळा कांदा १५० ते १७० रुपये, सुपर गोळे कांदे एक नंबर १३० ते १५० रुपये, सुपर मीडियम दोन नंबर कांद्यास ११० ते १३० रुपये, गोल्टी कांदा ९० ते ११० रुपये, बदला कांदा ५० ते ८० रुपये, असा बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT