पुणे

निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयाबाबत संभ्रम

CD

मंचर, ता.४ : केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. तो एक एप्रिल २०२५ पासून लागू झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. परंतु अंमलबजावणीतील विलंबामुळे अद्याप दरात वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यात नाराजी आहे.
मंचर (ता.आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता.तीन) सात हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. दहा किलो गोळा कांद्याला १६० रुपये ते १७० रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या १५ दिवसाच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव अजून स्थिर आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
आंबेगाव, शिरूर तसेच खेड तालुक्यात सध्या शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग सुरू आहे. सध्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा बारखी नाही. त्यांनी कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून मंचर बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी कांदा पिशव्या आणण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत कांद्याचे अडते व मंचर बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब रंगनाथ बाणखेले म्हणाले, की केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची व ता. एक एप्रिलपासून अंमलबजावणीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली नाही. निर्यात करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांकडून अजून मागणी आलेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.”


दहा किलो कांद्याचे बाजारभाव पुढीलप्रमाणे : सुपर लॉट एक नंबर गोळा कांदा १६० ते १७०, सुपर कांदे १५० ते १६०, सुपर मीडियम कांदे १२५ ते १४०, गोल्टी कांदा ९० ते १२०, बदला/चिंगळी कांदा ५० ते ११०.


12911

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT